आपटा फाटा येथील शिवमंदिरात हृतिक रोशनने घेतले सहकुटुंब दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:32 AM2020-02-22T01:32:21+5:302020-02-22T01:32:39+5:30

आपटा फाटा येथील शिवमंदिराची उभारणी हृतिक रोशनचे आजोबा

Hrithik Roshan, accompanied by his family attended the Shiva Temple at Apata Fata | आपटा फाटा येथील शिवमंदिरात हृतिक रोशनने घेतले सहकुटुंब दर्शन

आपटा फाटा येथील शिवमंदिरात हृतिक रोशनने घेतले सहकुटुंब दर्शन

googlenewsNext

पनवेल : महाशिवरात्री देशभरात मोठ्या उत्साहात साजरी क रण्यात आली. पनवेलनजीक आपटा फाटा येथील शिवमंदिरात अभिनेता हृतिक रोशन यांनी सहकुटुंब हजेरी लावत शिवलिंगाचे दर्शन घेतले.

आपटा फाटा येथील शिवमंदिराची उभारणी हृतिक रोशनचे आजोबा व राकेश रोशन यांचे वडील ओमप्रकाश यांनी केली आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त आवर्जून हजेरी लावत असतात. तसेच दरवर्षी रोशन कुटुंबीय या ठिकाणी महाशिवरात्रीला उपस्थित राहत असतात. या वेळी हृतिक रोशनला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 

Web Title: Hrithik Roshan, accompanied by his family attended the Shiva Temple at Apata Fata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल