पनवेल : महाशिवरात्री देशभरात मोठ्या उत्साहात साजरी क रण्यात आली. पनवेलनजीक आपटा फाटा येथील शिवमंदिरात अभिनेता हृतिक रोशन यांनी सहकुटुंब हजेरी लावत शिवलिंगाचे दर्शन घेतले.
आपटा फाटा येथील शिवमंदिराची उभारणी हृतिक रोशनचे आजोबा व राकेश रोशन यांचे वडील ओमप्रकाश यांनी केली आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त आवर्जून हजेरी लावत असतात. तसेच दरवर्षी रोशन कुटुंबीय या ठिकाणी महाशिवरात्रीला उपस्थित राहत असतात. या वेळी हृतिक रोशनला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.