नवी मुंबई: मराठा आंदोलन निर्णायक टप्यावर आले असून सरकार सोबतच्या वाटाघाटीत काय होणार याकडे सर्व आंदोलकांचे लक्ष लागून राहिले आहे. मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात सभेला संबोधीत करणार आहेत. यामुळे सभेच्या ठिकाणी जनसागर उसळला आहे. रेल्वे स्टेशन, कोपरखैरणे रोड, तुर्भेरोडवर प्रचंड गर्दी झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे सरकारी शिष्टमंडळासोबत काय चर्चा झाली व ते आता कोणती भूमिका घेणार याची सर्व आंदोलकांना उत्सुकता लागली आहे. माथाडी भवन मधील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजीमहाराज चौकात सभेला संबोधित करणार आहेत. सभेच्या परिसरात चारही बाजूच्या रोडवर अलोट गर्दी जमली आहे. सर्वांनाचा सभेची उत्सुकता लागून राहिली आहे.