वृद्ध दाम्पत्याकडून माणुसकीचे दर्शन

By admin | Published: November 17, 2016 05:44 AM2016-11-17T05:44:55+5:302016-11-17T05:44:55+5:30

चलनातून बाद झालेल्या नोटांमुळे सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

Human philosophy from an elderly couple | वृद्ध दाम्पत्याकडून माणुसकीचे दर्शन

वृद्ध दाम्पत्याकडून माणुसकीचे दर्शन

Next

मुंबई : चलनातून बाद झालेल्या नोटांमुळे सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यात हातावर पोट असलेल्या मोलकरणींचाही समावेश आहे. मात्र, मालाडच्या चिंचोली बंदर रोडवर असलेल्या मधुर सोसायटीत पद्मनाभ कलगुटकर (७६) हे त्यांची पत्नी यशोदा (६५) ;‘ वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या घरी येणाऱ्या अंजली कौडर (३०) या मोलकरणीची गरज समजावून घेत, चक्क तिचे महिनाभराचे रेशन भरून दिले, तसेच तिला खर्चासाठी लागणारे सुट्टे पैसेदेखील दिले. है पैसे तासन्तास रांगेत उभे मिळवले होते, अशी प्रतिक्रिया या दाम्पत्याने दिली.

Web Title: Human philosophy from an elderly couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.