जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:50 AM2019-08-05T00:50:14+5:302019-08-05T00:50:22+5:30

अनेक गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; जनजीवन ठप्प; नागरिकांमध्ये भीती

Hundreds of villages in the district lost contact | जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला

जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल चार हजार ३८ मिमी म्हणजेच सरासरी २५२.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे.अलिबाग तालुक्यातील सुमारे २० गावात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपाळ झाली.

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेंरड, शहाबाज, रामराज, बहीराचा पाडा, माणकुले, पेझारी, पोयनाड, नवेदर बेली, खानाव, श्रीगाव मेढेखार हि गावे पाण्यात बुडाली आहेत. अलिबाग शहरातील, बस स्टॅण्ड, पीएनपी नगर, तळकर नगर, रामनाथ, कोळीवाडा, श्रीबाग-२, रायवाडी, घरत आळी या ठिकाणी सुमारे चार फुटापर्यंत पाणी भरले होते.

अलिबाग तालुक्यातील कुडूर्स गावातील हर्षद बेणसेकर यांच्या एकाच वेळी २३ म्हशी मृत पावल्या आहेत. त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिताडा व्हीलेज अशी नुकतीच ओळख निर्माण करणाऱ्या धेरंड-शहापूरमधील शेतकऱ्यांची जिताडा माशांचे शेततळे पुराच्या पाण्यात बुडाले. त्यामुळे शेत तळ््यातील मासे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

Web Title: Hundreds of villages in the district lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर