अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल चार हजार ३८ मिमी म्हणजेच सरासरी २५२.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे.अलिबाग तालुक्यातील सुमारे २० गावात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपाळ झाली.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेंरड, शहाबाज, रामराज, बहीराचा पाडा, माणकुले, पेझारी, पोयनाड, नवेदर बेली, खानाव, श्रीगाव मेढेखार हि गावे पाण्यात बुडाली आहेत. अलिबाग शहरातील, बस स्टॅण्ड, पीएनपी नगर, तळकर नगर, रामनाथ, कोळीवाडा, श्रीबाग-२, रायवाडी, घरत आळी या ठिकाणी सुमारे चार फुटापर्यंत पाणी भरले होते.अलिबाग तालुक्यातील कुडूर्स गावातील हर्षद बेणसेकर यांच्या एकाच वेळी २३ म्हशी मृत पावल्या आहेत. त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिताडा व्हीलेज अशी नुकतीच ओळख निर्माण करणाऱ्या धेरंड-शहापूरमधील शेतकऱ्यांची जिताडा माशांचे शेततळे पुराच्या पाण्यात बुडाले. त्यामुळे शेत तळ््यातील मासे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:50 AM