शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पनवेलमध्ये झोपडीधारक वाऱ्यावर

By admin | Published: February 15, 2017 4:55 AM

सरकारचे २०१० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याचे धोरण असताना पनवेलमधील झोपडपट्टीतील रहिवाशांना महापालिकेने

कळंबोली : सरकारचे २०१० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याचे धोरण असताना पनवेलमधील झोपडपट्टीतील रहिवाशांना महापालिकेने अनधिकृत असल्याचा अभिप्राय पनवेल शहर पोलिसांना दिला आहे. त्यामुळे पडताळणीसाठी आलेल्या झोपडीपट्टीतील रहिवाशांच्या कागदपत्रांवर निगेटिव्ह रिमार्क दिला जात असून त्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांचे शैक्षणिक, व्यावसायिक तसेच आर्थिक नुकसान होवू लागले आहे.पनवेल परिसरात नवनवीन प्रकल्प येत असून रोजगार व्यवसायासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने कामगारवर्गाचे स्थलांतर होत आहे. या वर्गाकडून झोपड्या बांधण्यात येत असून शहरातील लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर, नवनाथनगर, मालधक्का, आझादनगर, इंदिरानगर, काशीबाई वस्ती, आसुडबाग, पंचशीलनगर, वाल्मीनगर, अशोकबाग, भारतनगर, भीमनगर, सिध्दार्थनगर, कातकरीवाडी या झोपडपट्ट्या आहेत. याठिकाणी अनेक वर्षांपासून कामगारवर्ग राहत असून त्यांच्याकडून पनवेल महापालिकेला घरपट्टीही अदा करण्यात येत आहे. त्यांची मतदार यादीत नावे आहेत त्याचबरोबर मतदानाचा हक्क सुध्दा ही मंडळी बजावतात. पालिका प्रशासनाकडून त्यांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच महावितरणकडून वीज जोडणी सुध्दा देण्यात आलेली आहे.पनवेल नगरपालिकेने बायोमेट्रिक सर्व्हे सुध्दा केला आहे. पनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प करून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान आवास योजनेत सहभाग नोंदवून झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या संदर्भात प्रशासन आग्रही आहे. सुरुवातीला १९९९ मध्यंतरी २००० आणि त्यानंतर २०१० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याचे सरकारी धोरण असतानाही सध्या झोपडपट्टीतील रहिवाशांना अनधिकृत ठरविण्यात येत आहे.