मी तपासात कसूर केली नाही - अजमुद्दीन मुल्ला यांचा खुलासा

By admin | Published: March 31, 2017 06:18 AM2017-03-31T06:18:28+5:302017-03-31T06:18:28+5:30

नगरपरिषद क्षेत्रातील गुंडगे येथील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लंैगिक अत्याचार झाले.

I did not fault the investigation - the disclosure of Ajmuddin Mullah | मी तपासात कसूर केली नाही - अजमुद्दीन मुल्ला यांचा खुलासा

मी तपासात कसूर केली नाही - अजमुद्दीन मुल्ला यांचा खुलासा

Next

कर्जत : नगरपरिषद क्षेत्रातील गुंडगे येथील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लंैगिक अत्याचार झाले. अशा वेळी कोणीही पोलीस अधिकारी गप्प का बसेल, मला कोणाचा दबाव नाही? मी तपासात कोणतीही कसूर केली नाही. मी या घटनेचा प्रामाणिकपणे तपास केला आहे आणि करत आहे, अशी माहिती कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
गुंडगे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लंैगिक अत्याचार प्रकरणी बाल कल्याण समिती रायगड यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करून, २७ मार्च रोजी कर्जत येथे पत्रकार परिषद घेतली. याबाबत बुधवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गुंडगे येथील अल्पवयीन मुलगी ९ सप्टेंबर २०१६ रोजी हरवली, याबाबत तिच्या घरच्यांनी १७ सप्टेंबर २०१६ रोजी कर्जत पोलीस ठाण्यात मिसिंग व फूस लावून पळवून नेल्याबाबत तक्र ार दाखल केली. ती मिसिंग झाल्यानंतर तिला कोणीतरी खोपोली येथे पाहिले. याची माहिती मिळताच आमचे कर्मचारी खोपोली येथे जाऊन आले. मात्र, तेथे ती सापडली नाही,असे मुल्ला यांनी सांगितले.
११ मार्च २०१७ रोजी ती मुलगी कर्जतमध्ये आली. मात्र, गुंडगे येथे तिचे आईवडील राहात नसल्याने त्याच्या घराच्या बाजूला राहात असलेल्या बाईने तिला कर्जत पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी माझ्यासमोर आमच्या महिला कर्मचारी व महिला दक्षता कमिटी सदस्या यांनी तिची चौकशी केली. मात्र, तिने त्यावेळी अशा काही घटना घडल्या आहेत, असे सांगितले नाही. ती अल्पवयीन असल्याने मी तिला तातडीने महिला वसतिगृहात पाठवले. त्यानंतर तिला १२ मार्च रोजी अलिबाग येथे बाल कल्याण समिती समोर नेण्यात आले. त्यावेळी तिने, माझ्याबाबत लंैगिक अत्याचार झाले, असे सांगितले. याबाबतची माहिती आम्हाला कळविण्यात आली नाही. मात्र, १२ मार्च रोजीच बाल कल्याण समितीने कर्जत पोलीस ठाण्याला पत्र दिले. त्यामध्ये त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, असे नमूद करून चार गोष्टींचे आदेश दिले. त्या आदेशाचे पालन आम्ही केले, असे मुल्ला यांनीसांगितले. त्या आदेशाचे पत्र माझ्या टेबलवर ४ मार्च रोजी आले व पोलीस नाईक यांच्याकडील ही केस सहायक पोलीस निरीक्षक विजय चौरे यांच्याकडे तपासासाठी वर्ग केली. १५ मार्च रोजी तिची कर्जतच्या उपजिल्हा
रुग्णालयात तपासणी केली असे मुल्ला यांनी सांगितले. (वार्ताहर)

संशयित चौघांना घेतले ताब्यात

१६ मार्च रोजी तिचा तपासणी अहवाल मिळाल्यानंतर पेण येथील महिला पोलीस अधिकारी, दक्षता समिती सदस्यांसमोर तिची पुन्हा चौकशी करण्यात आली.
बाल कल्याण समितीच्या समोर त्या मुलीने माहिती दिली ती माहिती मला २४ मार्चला मिळाली व २८ मार्चला संशयित तिघांना, २९ मार्च रोजी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यामध्ये एक महिला व तीन पुरु ष आहेत.

Web Title: I did not fault the investigation - the disclosure of Ajmuddin Mullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.