कोविडमध्ये हौसिंग सोसायटीचा आदर्श; खारघरातील स्पॅगेटी गृहनिर्माण संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:03 AM2020-07-22T00:03:16+5:302020-07-22T00:03:36+5:30

अत्यावश्यक सेवा सोसायटीत केल्या उपलब्ध

The ideal of a housing society in Kovid; Spaghetti Housing Society in Kharghar | कोविडमध्ये हौसिंग सोसायटीचा आदर्श; खारघरातील स्पॅगेटी गृहनिर्माण संस्था

कोविडमध्ये हौसिंग सोसायटीचा आदर्श; खारघरातील स्पॅगेटी गृहनिर्माण संस्था

googlenewsNext

- वैभव गायकर

पनवेल : कोरोनाचा आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण पडत असताना, वैयक्तिक पातळीवर कोरोनाविरोधी लढ्यात प्रत्येकाचा सक्रिय सहभाग घेण्याची ही वेळ आहे. याचा आदर्श परिपाठ खारघर येथील स्पॅगेटी गृहनिर्माण सोसायटीने घालून दिला आहे. कोरोनाविरोधी लढ्यासाठी सोसायटीने राबविलेल्या अभिवन उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

कोविड रुग्णाला उपचार मिळत नसल्याने, अनेकांचा जीव धोक्यात येत असल्याची उदाहरणे ऐकण्यास मिळत असतात. अशा वेळी आपल्या प्राथमिक स्वरूपाची यंत्रणा असली, तरी कोविड रुग्णाचा जीव आपण वाचवू शकतो. याकरिता खारघर सेक्टर १५ मधील स्पॅगेटी हौसिंग सोसायटीने विविध यंत्रणा आपल्या सोसायटीतच उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये आॅक्सिजन कॅन,थर्मल गन, पल्स आॅक्सिमीटर आदींचा समावेश आहे.

अस्थमा, मधुमेह, हृदयविकार व अन्य आजार असलेल्यांना कोविडची लागण झाल्यास, त्यांना श्वसनाचा त्रास होतो. त्यांना आॅक्सिजनची गरज पडते. याचा विचार करून, स्पॅगटी गृहनिर्माण संस्थेने आॅक्सिजन कॅन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सदर कॅनमध्ये सुमारे ६ लीटर शुद्ध आॅक्सिजन असून, कोठेही सुलभतेने वापरता येईल व प्रवासातही सोबत ठेवता येणार आहे. कारण सदर कॅनचे वजन फक्त १२० ग्रॅम इतके आहे. श्वसनाचा त्रास होत असलेल्या रुग्णांना अ‍ॅम्बुलन्स येण्यास लागणारा कालावधी, तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत (तात्पुरती व्यवस्था) म्हणून या आॅक्सिजन कॅनची गरज आहे.

लहान सहान गोष्टींसाठी सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता, आपलेही काही कर्तव्य आहे. या हेतूने आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे सोसायटीचे सचिव यशवंत देशपांडे यांनी सांगितले. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या नित्याच्या कामाबरोबरच आॅक्सिजन कॅनही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन देशपांडे यांनी इतर सोसायट्यांना केला आहे.

२000 रहिवाशांचे वास्तव्य

च्स्पॅगेटी सोसायटीत ४५६ सदनिकांच्या या गृहसंकल्पात २०००पेक्षा अधिक रहिवासी आहेत. प्रवेशद्वारावरच तापमान मोजण्यासाठी धर्मल गन ठेवली असून, रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी पल्स आॅक्सिमीटरही उपलब्ध केले आहे. तसेच सॅनिटायझरची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन शिवाजी पाटील यांनी दिली.

Web Title: The ideal of a housing society in Kovid; Spaghetti Housing Society in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.