पनवेलमधील सुकलेले वृक्ष तोडण्याचा मुहूर्त सापडेना
By Admin | Published: November 17, 2016 05:42 AM2016-11-17T05:42:59+5:302016-11-17T05:42:59+5:30
माथेरान रस्त्यावरील पर्जन्य वृक्ष अचानक सुकल्याने तो भाग रखरखीत झाला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर सावली शोधावी लागते.
पनवेल : माथेरान रस्त्यावरील पर्जन्य वृक्ष अचानक सुकल्याने तो भाग रखरखीत झाला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर सावली शोधावी लागते. पंतप्रधान जनतेला पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षलागवड करण्याचे आवाहन करतात तर मुख्यमंत्री त्यासाठी अनेक उपक्र म राबवतात असे असताना वर्ष होवूनही या ठिकाणी नवीन वृक्षलागवड करण्यासाठी सिडकोच्या वृक्ष प्राधिकरण समितीला वेळ मिळाला नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
पनवेल-माथेरान रस्त्यावर एचडीएफसी सर्कलच्या पुढे रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठे वृक्ष रस्त्यावरून जाणाऱ्यांना अनेक वर्षे सावली देत होते. तेथील छोटा व्यवसाय करणाऱ्यांना त्या झाडाच्या सावलीत बसून भाकरी खाता येत होती. तसेच दुपारी विश्रांती घेता येत असे. गेल्या वर्षी हे वृक्ष अचानक सुकले. रात्री या वृक्षांना केमिकलचे इंजेक्शन दिले असावे असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. सिडको मात्र मावा रोगामुळे वृक्ष सुकले असल्याचे सांगते. रस्त्याच्या एका बाजूच्या वृक्षाच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. मात्र गणेश मार्केट बाजूच्या झाडाच्या फांद्या अद्याप तोडल्या नाहीत. त्यामुळे या धोकादायक फांद्या कोणाच्याही डोक्यावर पडू शकतात. याबाबत येथील रहिवाशांनी आम्ही सिडकोकडे फांद्या तोडण्यासाठी लेखी तक्र ार करून त्याचा काही उपयोग झाला नसल्याने नाराजी व्यक्त के ली आहे. (वार्ताहर)