शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 5:18 AM

तुटपुंजा अतिकालिक भत्ता : जादा कामासाठी नाका कामगारांपेक्षाही कमी मोबदला

नामदेव मोरेनवी मुंबई : शहरातील १४ लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अग्निशमन कर्मचाºयांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एमआयडीसीसह सिडको आठ तासांच्या ओव्हर टाइमसाठी ९०० ते १२०० रुपये भत्ता देत असताना, नवी मुंबईमध्ये मात्र फक्त १९० रुपये दिले जात आहेत. जादा कामासाठी कंत्राटी व नाका कामगारांपेक्षाही कमी मोबदला दिला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये ४७५ अधिकारी व कर्मचाºयांची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात १३९ अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून, यामध्ये अग्निशामकांची संख्या फक्त ८५ एवढीच आहे. सद्यस्थितीमध्ये ऐरोली, वाशी, नेरुळ व सीबीडी अशी चार अग्निशमन केंद्रे असून, २४ तास येथील कर्मचाºयांना दक्ष राहावे लागत असते. नियमाप्रमाणे एक अग्निशमन वाहनासाठी एक अधिकारी, एक उपअग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, दोन यंत्रचालक व तीन अग्निशामक असे जवळपास १२ कर्मचारी आवश्यक आहेत. केंद्रावरील कार व जिपसाठी दोन कर्मचारी आवश्यक असतात. तीन शिफ्टमध्ये काम चालत असल्यामुळे एका गाडीसाठी २४ तासांमध्ये ३६ व कार व जिपसाठी सहा कर्मचाºयांची आवश्यकता आहे; पण मनपाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे कामगारांना जादा काम करावे लागत आहे. जादा कामासाठी अत्यंत तुटपुंजा मोबदला दिला जात आहे. आठ तास जादा काम केल्यानंतर १९० रुपये भत्ता दिला जातो. नाशिकमध्ये ९११, सिडकोमध्ये १२४२, एमआयडीसीमध्ये याच कामासाठी ९११ रुपये दिले जात आहेत.नवी मुंबई राज्यातील श्रीमंत महानगरपालिका असून, शहराच्या सुरक्षेचे महत्त्वाचे काम करणाºया अग्निशमन कर्मचाºयांना जादा कामाचा भत्ता देण्यास का कंजुसी केली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिघा ते सीबीडीपर्यंत पसरलेल्या नागरी वसाहती, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आग विझविण्याचे काम मनपाचे कर्मचारी करत आहेत. याबरोबर शहरात वृक्ष कोसळणे, अपघात व इतर दुर्घटनांमध्ये मदतीसाठी अग्निशमन दलाचे जवान धावपळ करत असतात.पक्षी अडकल्यापासून नागरी वस्तीमध्ये साप आढळला तरी अग्निशमन कर्मचाºयांना बोलावण्यात येते. स्वत:चा जीव धोक्यात घालून शहरवासीयांना मदत करणाºया या अग्निशमन कर्मचाºयांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अग्निशमन कर्मचाºयांना ओव्हर टाइम मोबदला मिळावा, यासाठी प्रस्ताव तयार करून तो प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. हा विषय निर्णय प्रक्रियेमध्ये असून, प्रशासन विभागाच्या मंजुरीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.- रवींद्र पाटील,अतिरिक्त आयुक्त, महापालिकान्याय मिळावामहापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी यापूर्वी ठोक मानधनावरील शिक्षक, कंत्राटी कामगार, शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी सेविका, मदतनीस यांना वेतनवाढ व प्रलंबित देणी देऊन न्याय मिळवून दिला आहे. अग्निशमन कर्मचाºयांनाही न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलfireआगNavi Mumbaiनवी मुंबई