अग्रोळी गावातील समस्यांकडे दुर्लक्ष

By admin | Published: July 3, 2017 06:37 AM2017-07-03T06:37:30+5:302017-07-03T06:37:30+5:30

अग्रोळी गावात प्रकल्पग्रस्तांना खेळासाठी मैदान, तसेच उद्यानाचे शहर अशी ओळख असलेल्या शहरातील या परिसरात उद्यान नसल्याने

Ignore problems in Agroli village | अग्रोळी गावातील समस्यांकडे दुर्लक्ष

अग्रोळी गावातील समस्यांकडे दुर्लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अग्रोळी गावात प्रकल्पग्रस्तांना खेळासाठी मैदान, तसेच उद्यानाचे शहर अशी ओळख असलेल्या शहरातील या परिसरात उद्यान नसल्याने ग्रामस्थांकडून महापालिका प्रशासनाच्या उदासीन काराभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आगे. गेली कित्येक वर्षे या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न आजवर मार्गी लागला नसून शहर विकास करताना गावठाणाचा विकास का केला जात नाही? असा जाब प्रशासनाला विचारण्यात आला आहे.
गेली कित्येक वर्षे अग्रोळी गावातील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका सरोज पाटील यांनी व्यक्त केली. मैदान तसेच उद्यानाचा अभाव असलेल्या या गावातील मुलांनी खेळण्यासाठी कुठे जायचे? असा प्रश्न पाटील यांनी सर्व साधारण सभेतही उपस्थित केला होता. मात्र, याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याने दिवसेंदिवस गावातील समस्या वाढत असल्याचा असंतोष पाटील यांनी व्यक्त केला. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडीमोलात घेऊनदेखील सिडको आम्हाला नोटीस बजावून त्रास देत आहे. या ठिकाणी स्कायवॉक नसल्याने रहिवाशांना, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन मार्ग ओलांडावा लागत आहे. महासभेत मांडलेल्या या समस्यांवर पुढील महासभा बैठकीत अत्यावश्यक कामांचे प्रस्ताव पटलावर आणून मंजूर करण्याचे आश्वासन महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिले.

सतत पाठपुरावा करून तसेच विविध विभागांतील अधिकाऱ्यांची भेट घेऊनही कामाला सुरुवात केली जात नाही, याचा अर्थ नगरसेवकांना अधिकाऱ्यांकडून काही किंमतच दिली जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरसेविका सरोज पाटील यांनी व्यक्त केली. अग्रोळी गावातील समस्या लवकरात लवकर सोडविल्या नाहीत तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारादेखील पाटील यांनी दिला.

Web Title: Ignore problems in Agroli village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.