वंडर्स पार्कमधील धोकादायक खेळण्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 01:51 AM2019-09-29T01:51:16+5:302019-09-29T01:51:50+5:30
नेरु ळ येथील वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी झाली असून, गंजल्याने धोकादायक झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून वापरासाठी बंद करण्यात आलेल्या खेळण्यांच्या दुरु स्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.
नवी मुंबई : नेरु ळ येथील वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी झाली असून, गंजल्याने धोकादायक झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून वापरासाठी बंद करण्यात आलेल्या खेळण्यांच्या दुरु स्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली खेळणी १ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहेत; परंतु नादुरु स्त खेळण्यांमुळे पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने नेरु ळ सेक्टर १९ येथे वंडर्स पार्कची निर्मिती केली आहे. यामुळे शहराच्या आकर्षणात भर पडली असून, शहराचा नावलौकिक वाढण्यास मदत मिळाली आहे. पार्कमध्ये मिनी टॉय ट्रेन, आकाश पाळणा, ब्रेक डान्स, फेसबी, जम्पिंग मिकी माउस, बंजी जम पेंडल कार, आॅक्टोपस, क्रि केट, टायर असलेली टॉय ट्रेन आदी आकर्षक खेळणी बसविण्यात आलेली आहेत. त्यामुळे या पार्कमध्ये शहरातून आणि शहराबाहेरून येणाºया नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. पार्कमध्ये बसविण्यात आलेली खेळणी जुनी झाली असून वेळेवर देखभाल दुरु स्ती होत नसल्याने खेळणी वारंवार नादुरु स्त होत आहेत. पार्कमधील या सर्व लोखंडी खेळण्यांना गंज लागला असून अनेक अवजड खेळणी वेल्डिंग करून चालविण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वी अनेक खेळण्यांचे अपघात घडले असून, नागरिक व लहान मुले जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या पार्कमधील फेसबी आणि आॅक्टोपस, पाळणा धोकादायक स्थितीमध्ये आहे. याबाबतची बातमी ‘लोकमत’ने १९ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने पार्कमधील खेळण्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान आॅक्टोपस आणि फेसबी ही दोन्ही खेळणी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर महापालिकेने दोन्ही खेळणी वापरासाठी बंद केली होती. पार्कमधील खेळणी विजेवर चालणारी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात खेळणी बंद ठेवण्यात येतात. या सुट्टीच्या दरम्यान पार्कमधील खेळणी आणि इतर देखभाल दुरु स्तीची कामे करणे आवश्यक असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. १ आॅक्टोबरपासून पार्कमधील खेळणी नागरिकांसाठी सुरू केली जाणार असली तरी धोकादायक खेळण्यांची दुरु स्ती न झाल्याने ही खेळणी नागरिकांना तसेच बच्चे कंपनीला वापरता येणार नाहीत. त्यामुळे पार्कमध्ये येणाºया नागरिकांचा आणि बच्चे कंपनीचा हिरमोड होणार आहे.