लॉजिंग-बोर्डिंगमधील अवैध धंद्यांना अभय, गुन्हेगारांसाठी झाले आश्रयस्थान, बलात्कारांच्या घटनांमध्ये होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:45 AM2017-12-03T02:45:52+5:302017-12-03T02:46:17+5:30

शहरातील लॉजिंग-बोर्डिंग अवैध धंद्याची ठिकाणे ठरत आहेत. अशा ठिकाणी वेश्याव्यवसायासह प्रेमप्रकरणातून अनैतिक संबंधांचे प्रकार घडत आहेत. कालांतराने त्यांच्यात वाद झाल्यास बलात्काराच्या तक्रारी पोलिसांपर्यंत येत आहेत. शिवाय गुन्हेगारांना आश्रय घेण्यासाठी ही लॉजिंग-बॉर्डिंग सोयीची ठरत आहेत.

In illegal lodging-boarding, abducted, abducted refugees for criminals, rise in rape cases | लॉजिंग-बोर्डिंगमधील अवैध धंद्यांना अभय, गुन्हेगारांसाठी झाले आश्रयस्थान, बलात्कारांच्या घटनांमध्ये होतेय वाढ

लॉजिंग-बोर्डिंगमधील अवैध धंद्यांना अभय, गुन्हेगारांसाठी झाले आश्रयस्थान, बलात्कारांच्या घटनांमध्ये होतेय वाढ

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : शहरातील लॉजिंग-बोर्डिंग अवैध धंद्याची ठिकाणे ठरत आहेत. अशा ठिकाणी वेश्याव्यवसायासह प्रेमप्रकरणातून अनैतिक संबंधांचे प्रकार घडत आहेत. कालांतराने त्यांच्यात वाद झाल्यास बलात्काराच्या तक्रारी पोलिसांपर्यंत येत आहेत. शिवाय गुन्हेगारांना आश्रय घेण्यासाठी ही लॉजिंग-बॉर्डिंग सोयीची ठरत आहेत.
एका शहरातून दुस-या शहरात कामानिमित्ताने काही दिवसांसाठी स्थलांतरित झालेल्यांना विसाव्यासाठी लॉजिंग-बोर्डिंगची स्वस्तातील संकल्पना अस्तित्वात आली आहे. मात्र, सध्या लॉजिंग-बोर्डिंगचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. वेश्याव्यवसायासह प्रेमप्रकरणातील अनैतिक संबंधांसाठी लॉजचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. शहरात आॅनलाइन सेक्स रॅकेटचेही जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून, त्यांच्याकडूनही लॉजचा वापर होत आहे. ग्राहकासोबत फोनवर संपर्क साधल्यानंतर ठरावीक लॉजमध्ये महिलेसह त्याची सोय केली जाते. अशा काही रॅकेट व लॉजवर यापूर्वी पोलिसांनी पिटा कायद्यांतर्गत कारवायाही केल्या आहेत. पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने लॉजमधील अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा बसलेला नाही.
गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी लॉजमध्ये येणाºयांची सविस्तर नोंद ठेवण्याच्या सूचना आहेत. तसेच अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी त्या ठिकाणी येणार नाही, याची खबरदारी घेण्याचेही आदेश आहेत. असे असतानाही सर्व नियमांना बगल देत केवळ अवैध धंद्यांना आश्रय देण्याच्या उद्देशानेच शहरात शेकडोच्या संख्येने लॉज चालवले जात आहेत. एपीएमसी, खैरणे एमआयडीसी, शिरवणे, नेरुळ एमआयडीसी या ठिकाणी त्याची संख्या जास्त आहे. बंद कंपन्यांच्या जागी तसेच रहिवासी इमारतींच्या जागेवर चालणाºया लॉजमध्ये सोयीनुसार अनधिकृत बांधकाम करून खोल्या तसेच लपण्याची ठिकाणे बनवली जात आहेत. त्याकडे पालिका अधिकाºयांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे पाहवयास मिळते. महापालिकेने अशा लॉजची झडाझडती घेतल्यास ठाण्याप्रमाणे भूमिगत खोल्या आढळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. वेश्याव्यवसायासाठी पुरवल्या जाणाºया महिला, मुलींवर पूर्णपणे दलालांची सक्ती असते. ग्राहकांकडून तीन ते पाच हजार रुपये घेतल्यानंतर त्यांना ५०० ते १००० रुपये दिले जातात. बहुतांश महिला अथवा मुली परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अथवा नोकरीचे आमिष दाखवून परराज्यांतून आणलेल्या असतात. पोलिसांच्या कारवाईत असे काही प्रकार उघडही झालेले आहेत. वर्षभरात लॉजवरील कारवाया तुरळक झाल्या आहेत. लॉज हे शहरातीलच काही बारमालकांचे असून त्यांना राजकीय आश्रयही लाभत आहे. कारवाईत दुर्लक्ष करून पोलीसही हेतू साध्य करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कोपरखैरणेतील एका बारमालकाचा एमआयडीसीमध्ये लॉज असून, बारमध्ये आलेल्या ग्राहकाला सदर लॉजवर महिला पुरवल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वी बारवर कारवाईचा दिखावा झालेला आहे. त्यामुळे लॉजमधील अवैध धंद्यांना नेमके अभय कोणाचे? असा प्रश्न उद्भवत आहे.

प्रेमसंबंधातून अनैतिक प्रकार
बलात्काराच्या बहुतांश घटना प्रेमसंबंधातून होत असल्याचे वेळोवेळी पोलीस तपासात समोर येत आहे. मर्जीने शरीरसंबंध केल्यानंतर काही दिवसांनी दोघांत वाद झाल्यास बलात्काराची तक्रार केली जाते. तर असे प्रकार लॉजवर अथवा एकांताच्या ठिकाणी झाल्याचे अनेक तक्रारींमध्ये नमूद आहे. अल्पवयीन मुलींनाही फूस लावून बलात्कार करण्यासाठी लॉजचा वापर होत आहे. त्यामुळे बलात्कारांच्या अशा गुन्ह्यांमध्ये लॉजचालकालाही कटात दोषी धरून कारवाई होणे अपेक्षित आहे.

नागरिकांचा विरोध
शहरातील जुहूगाव, तुर्भेगाव, शिरवणे आदी गावांना लॉजनी विळखा घातला आहे. त्या ठिकाणी चालणाºया अनैतिक धंद्यांविरोधात स्थानिकांनी अनेकदा आवाज उठवला आहे. त्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने वर्षभरापूर्वी जुहूगावातील नागरिकांनी लॉजची तोडफोड केल्याचाही प्रकार घडलेला आहे.

लॉजमधील अथवा इतर कुठेही चालणा-या अनैतिक धंद्यांची तक्रार आल्यास कारवाई केली जाते. त्याकरिता स्वतंत्र युनिटही तयार करण्यात आले आहे. या युनिटकडून तसेच स्थानिक पोलिसांकडून नियमित कारवाया होत असतात.
- तुषार दोशी,
उपआयुक्त, गुन्हे शाखा

Web Title: In illegal lodging-boarding, abducted, abducted refugees for criminals, rise in rape cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.