शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

लॉजिंग-बोर्डिंगमधील अवैध धंद्यांना अभय, गुन्हेगारांसाठी झाले आश्रयस्थान, बलात्कारांच्या घटनांमध्ये होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:45 AM

शहरातील लॉजिंग-बोर्डिंग अवैध धंद्याची ठिकाणे ठरत आहेत. अशा ठिकाणी वेश्याव्यवसायासह प्रेमप्रकरणातून अनैतिक संबंधांचे प्रकार घडत आहेत. कालांतराने त्यांच्यात वाद झाल्यास बलात्काराच्या तक्रारी पोलिसांपर्यंत येत आहेत. शिवाय गुन्हेगारांना आश्रय घेण्यासाठी ही लॉजिंग-बॉर्डिंग सोयीची ठरत आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातील लॉजिंग-बोर्डिंग अवैध धंद्याची ठिकाणे ठरत आहेत. अशा ठिकाणी वेश्याव्यवसायासह प्रेमप्रकरणातून अनैतिक संबंधांचे प्रकार घडत आहेत. कालांतराने त्यांच्यात वाद झाल्यास बलात्काराच्या तक्रारी पोलिसांपर्यंत येत आहेत. शिवाय गुन्हेगारांना आश्रय घेण्यासाठी ही लॉजिंग-बॉर्डिंग सोयीची ठरत आहेत.एका शहरातून दुस-या शहरात कामानिमित्ताने काही दिवसांसाठी स्थलांतरित झालेल्यांना विसाव्यासाठी लॉजिंग-बोर्डिंगची स्वस्तातील संकल्पना अस्तित्वात आली आहे. मात्र, सध्या लॉजिंग-बोर्डिंगचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. वेश्याव्यवसायासह प्रेमप्रकरणातील अनैतिक संबंधांसाठी लॉजचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. शहरात आॅनलाइन सेक्स रॅकेटचेही जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून, त्यांच्याकडूनही लॉजचा वापर होत आहे. ग्राहकासोबत फोनवर संपर्क साधल्यानंतर ठरावीक लॉजमध्ये महिलेसह त्याची सोय केली जाते. अशा काही रॅकेट व लॉजवर यापूर्वी पोलिसांनी पिटा कायद्यांतर्गत कारवायाही केल्या आहेत. पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने लॉजमधील अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा बसलेला नाही.गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी लॉजमध्ये येणाºयांची सविस्तर नोंद ठेवण्याच्या सूचना आहेत. तसेच अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी त्या ठिकाणी येणार नाही, याची खबरदारी घेण्याचेही आदेश आहेत. असे असतानाही सर्व नियमांना बगल देत केवळ अवैध धंद्यांना आश्रय देण्याच्या उद्देशानेच शहरात शेकडोच्या संख्येने लॉज चालवले जात आहेत. एपीएमसी, खैरणे एमआयडीसी, शिरवणे, नेरुळ एमआयडीसी या ठिकाणी त्याची संख्या जास्त आहे. बंद कंपन्यांच्या जागी तसेच रहिवासी इमारतींच्या जागेवर चालणाºया लॉजमध्ये सोयीनुसार अनधिकृत बांधकाम करून खोल्या तसेच लपण्याची ठिकाणे बनवली जात आहेत. त्याकडे पालिका अधिकाºयांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे पाहवयास मिळते. महापालिकेने अशा लॉजची झडाझडती घेतल्यास ठाण्याप्रमाणे भूमिगत खोल्या आढळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. वेश्याव्यवसायासाठी पुरवल्या जाणाºया महिला, मुलींवर पूर्णपणे दलालांची सक्ती असते. ग्राहकांकडून तीन ते पाच हजार रुपये घेतल्यानंतर त्यांना ५०० ते १००० रुपये दिले जातात. बहुतांश महिला अथवा मुली परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अथवा नोकरीचे आमिष दाखवून परराज्यांतून आणलेल्या असतात. पोलिसांच्या कारवाईत असे काही प्रकार उघडही झालेले आहेत. वर्षभरात लॉजवरील कारवाया तुरळक झाल्या आहेत. लॉज हे शहरातीलच काही बारमालकांचे असून त्यांना राजकीय आश्रयही लाभत आहे. कारवाईत दुर्लक्ष करून पोलीसही हेतू साध्य करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कोपरखैरणेतील एका बारमालकाचा एमआयडीसीमध्ये लॉज असून, बारमध्ये आलेल्या ग्राहकाला सदर लॉजवर महिला पुरवल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वी बारवर कारवाईचा दिखावा झालेला आहे. त्यामुळे लॉजमधील अवैध धंद्यांना नेमके अभय कोणाचे? असा प्रश्न उद्भवत आहे.प्रेमसंबंधातून अनैतिक प्रकारबलात्काराच्या बहुतांश घटना प्रेमसंबंधातून होत असल्याचे वेळोवेळी पोलीस तपासात समोर येत आहे. मर्जीने शरीरसंबंध केल्यानंतर काही दिवसांनी दोघांत वाद झाल्यास बलात्काराची तक्रार केली जाते. तर असे प्रकार लॉजवर अथवा एकांताच्या ठिकाणी झाल्याचे अनेक तक्रारींमध्ये नमूद आहे. अल्पवयीन मुलींनाही फूस लावून बलात्कार करण्यासाठी लॉजचा वापर होत आहे. त्यामुळे बलात्कारांच्या अशा गुन्ह्यांमध्ये लॉजचालकालाही कटात दोषी धरून कारवाई होणे अपेक्षित आहे.नागरिकांचा विरोधशहरातील जुहूगाव, तुर्भेगाव, शिरवणे आदी गावांना लॉजनी विळखा घातला आहे. त्या ठिकाणी चालणाºया अनैतिक धंद्यांविरोधात स्थानिकांनी अनेकदा आवाज उठवला आहे. त्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने वर्षभरापूर्वी जुहूगावातील नागरिकांनी लॉजची तोडफोड केल्याचाही प्रकार घडलेला आहे.लॉजमधील अथवा इतर कुठेही चालणा-या अनैतिक धंद्यांची तक्रार आल्यास कारवाई केली जाते. त्याकरिता स्वतंत्र युनिटही तयार करण्यात आले आहे. या युनिटकडून तसेच स्थानिक पोलिसांकडून नियमित कारवाया होत असतात.- तुषार दोशी,उपआयुक्त, गुन्हे शाखा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा