अवैध प्रवासी वाहतुकीचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:00 AM2019-01-31T00:00:09+5:302019-01-31T00:00:35+5:30

प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर; आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Illegal travel influx | अवैध प्रवासी वाहतुकीचे पेव

अवैध प्रवासी वाहतुकीचे पेव

Next

नवी मुंबई : शहरातील नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने शहरातील तसेच शहराबाहेरील विविध भागात एनएमएमटी बस सुरू केल्या आहेत; परंतु या मार्गावर बस फेऱ्यांची कमतरता असल्याने अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबईतील नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्र माची सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना शहराबरोबर शेजारील कल्याण-डोंबिवली, उरण, मुंबई, पनवेल, ठाणे, मुंब्रा आदी शहरातदेखील मोठ्या प्रमाणावर जाळे पसरविले आहे; परंतु अनेक मार्गांवर बसची संख्या आणि बस फेºया कमी असल्याने टाटा मॅजिक, इको, सुमो आदी खासगी वाहनांमधून नेरुळ रेल्वेस्थानक, जुईनगर रेल्वेस्थानक, सानपाडा, महापे, खारघर, कल्याण, डोंबिवली, वाशी, पनवेल आदी भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतूक करणाºया वाहनांमध्ये वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीवाहतूक केली जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे. उरण-जेएनपीटी भागात दररोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, जुईनगर रेल्वेस्थानकापासून कोप्रोलीपर्यंत एनएमएमटीची ३४ क्र मांकाची बस धावते. या मार्गावर एनएमएमटीच्या १२ बस धावत असून, दिवसाला सुमारे ८० फेºया पूर्ण केल्या जात आहेत; परंतु या फेºयाही अपूर्ण पडत असल्याने तसेच प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई असल्याने प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करीत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांची संख्या वाढल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

Web Title: Illegal travel influx

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.