उरणमध्ये २६८१ दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 10:17 PM2023-09-20T22:17:11+5:302023-09-20T22:17:29+5:30

यामध्ये सोसायट्यासह ३६ सार्वजनिक गणपतींचा समावेश आहे. 

Immersion of Ganapati for 2681 and a half days in Uran | उरणमध्ये २६८१ दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन 

उरणमध्ये २६८१ दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन 

googlenewsNext

 मधुकर ठाकूर -

उरण : उरण तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्यातील हद्दीतील २६८१ दिड दिवसांच्या गणपतींना बुधवारी  भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.   उरण परिसरात तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८७६० गणपती आहेत.यामध्ये सोसायट्यासह ३६ सार्वजनिक गणपतींचा समावेश आहे. 

उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सार्वजनिक गणपतीसह गुरुवारी १७३१ गणेश मुर्तींचे गुरुवारी शांततेत विसर्जन करण्यात आले.तर न्हावा-शेवा बंदर ठाण्याच्या हद्दीतील ७६५ आणि मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १८५ अशा दिड दिवसांच्या एकूण  २०४७ गणपतींचे विसर्जन करुन भावपूर्ण निरोप देण्यात आला.  

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी संध्याकाळपासूनच मिरवणुकीने नाचत वाजतगाजत सुरुवात झाली होती.घारापूरी,मोरा, माणकेश्वर, पीरवाडी, करंजा खोपटा,माणकटोक, न्हावा-खाडी आदी समुद्र खाड्या किनारी आणि शहरातील विमला,भवरा तसेच तालुक्यातील विविध गावांतील तलावात विसर्जनासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 

Web Title: Immersion of Ganapati for 2681 and a half days in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.