पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:25 AM2019-07-04T04:25:42+5:302019-07-04T04:25:55+5:30

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत.

 Immigrating due to flooding, villagers worry about poverty; Fear of theft in a dusty village | पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती

पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती

Next

- वैभव गायकर

पनवेल : अतिवृष्टीमुळे डुंगी गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण गावाला करंजाडे येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले. येथील शाळेमधील दोन वर्गात या ग्रामस्थांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्थलांतरित केलेले डुंगी ग्रामस्थ गावात चोरीच्या भीतीने चिंतेत आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत. मागील वर्षी देखील गावात पुराचे पाणी शिरले होते. मध्यंतरी डुंगी गावाचे देखील पुनर्वसन करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तास प्रस्ताव सिडकोने शासनाकडे पाठविला आहे. मात्र गावात शिरलेल्या पाण्यामुळे संपूर्ण गावाचे येथील कारंजाडे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित केल्यानंतर संपूर्ण डुंगी गाव ओस पडले आहे. ग्रामस्थांचे स्थलांतर केले असले तरी घरातील मौल्यवान वस्तू, सर्व सामान घरात असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. करंजाडे येथील गावातील शाळेतील दोन वर्गात ग्रामस्थांची राहायची व्यवस्था करण्यात आली आहे. सिडकोने वेळीच योग्य भूमिका घेतली नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरु आहेत. दरम्यान पावसाळ्यात ग्रामस्थांनी बाहेर राहण्यासाठी तहसील प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना ५0 हजारांची मदत तहसीलदार अमित सानप यांनी केली. त्यानुसार बुधवारी ५0 हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये १११ कुटुंबांना धनादेशाचे वाटप करण्यात आले तर उर्वरित ३0 कुटुंबाची चाचपणी सुरु असल्याचे सानप यांनी सांगितले. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी स्थलांतरित ग्रामस्थांची भेट घेवून सहकार्याचे आश्वासन दिले होते.

पोलीस बळ पुरविण्याची मागणी
स्थलांतरित झाल्यानंतर गाव ओस पडले आहे. गावातील विद्युत पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रात्री चोरीची घटना होऊ शकते. अशा परिस्थितीत गावात विद्युत पुरवठा सुरळीत करून गावात पोलीस बंदोबस्त द्यावा जेणेकरून गावात अनुचित प्रकार होणार नसल्याची मागणी ग्रामस्थ महेंद्र पाटील, मधुकर नाईक यांनी केली आहे.

बंबावी कोळीवाड्याला
देखील भरपाई द्या
बंबावी कोळीवाड्यात देखील पूरसदृश स्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरात पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाल्याने या ग्रामस्थांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मयूर भोईर यांनी सिडको व तहसीलदारांकडे केली आहे.

Web Title:  Immigrating due to flooding, villagers worry about poverty; Fear of theft in a dusty village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल