- नामदेव मोरे नवी मुंबई : प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यास तो जरूर थांबवावा, परंतु विनाकारण प्रस्ताव अडविल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. सभागृहानेच अशाप्रकारे अडवणूक केल्यास अधिकाºयांना काम करणे अशक्य होणार असल्याचे स्पष्ट मत शहर अभियंता मोहन डगावकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या सूचक वक्तव्यातून पालिकेत सर्व काही आलबेल नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.शहर अभियंता मोहन डगावकर यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावावर माहिती देताना अडवणुकीमुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. प्रस्तावामध्ये एखादी त्रुटी असल्यास तो जरूर थांबवावा, परंतु विनाकारण प्रस्ताव स्थगित केल्याने भविष्यात पुढाकार घेवून काम करण्यास कोणीही तयार होणार नाही. अनेक वेळा आम्ही ठेकेदारांकडून कामे करून घेतो. पण आमच्या मतांना महत्त्व दिले जाणार नसेल तर आमचेही कोणी ऐकणार नाही. कामे करून घेणे अवघड जाईल असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. शहर अभियंत्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे स्थायी समिती चकीत झाली. वास्तविक घनकचरा विभागाच्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली असली तरी त्यामागे खूप गंभीर अर्थ असल्याचे बोलले जात आहे. मागील काही स्थायी समिती बैठकीमध्ये अनेक प्रस्ताव स्थगित केले जात आहेत. विकासकामांचेही राजकारण होवू लागले आहे. ऐरोली परिसरामध्ये जलउदंचन केंद्र चालविणाºया ठेकेदाराविषयी प्रशासनाने मांडलेला प्रस्ताव सभागृहाने फेटाळून लावला. यामुळे अडचणीच्या काळामध्ये पालिकेला मदत करणाºया ठेकेदाराचे मोठे नुकसान झाले होते. पाणीपुरवठ्याचे काम सुरळीत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. याशिवाय शहरात चार ठिकाणी होर्डिंग लावण्याचा प्रस्तावही स्थायी समितीने थांबविला होता.राजकीय कुरघोडी करण्याची स्पर्धा लोकप्रतिनिधींमध्ये सुरू आहे. अधिकाºयांमध्येही प्रचंड गटबाजी सुरू झाली आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कायम सेवेत असलेले अधिकारी यांच्यामध्ये योग्य संवाद होत नाही. अधिकारीच एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. आयुक्तांनाही अद्याप अधिकाºयांमधील दरी दूर करण्यात यश आलेले नाही. महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधींचीही ठोस भूमिका राहिलेली नाही. एकूणच अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाºयांमधील ताण वाढू लागला आहे. खाजगीमध्ये चर्चा करताना अधिकाºयांमधील नैराश्याची भावना स्पष्टपणे दिसू लागली आहे. काहीतरी चांगले काम करायची इच्छाच राहिलेली नाही. काम करणाºयांना प्रोत्साहन मिळत नाही.अधिकाºयांमध्येच गटबाजी व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींचा दबाव. माहिती अधिकार कार्यकर्ते, सत्ताबाह्य केंद्र या सर्वांमध्ये अधिकारी व कर्मचारी भरडले जात आहेत. कामे करायला गेले की अडवणूक होते. कामे केली नाही की धारेवर धरले जाते. यामुळे नक्की करायचे काय असा प्रश्न वरिष्ठ अधिकारीच बोलू लागले असून त्या सर्वांचीच भूमिका शहर अभियंत्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखविल्याची चर्चा महापालिकेमध्ये सुरू झाली आहे.अधिकाºयांना प्रोत्साहनच नाहीमहापालिकेमधील अधिकारी व कर्मचाºयांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. चांगले काम करण्याची भावना कोणामध्येच राहिलेली नाही. जे अधिकारी भेटतील हतबलता व्यक्त करू लागले आहेत. कामे करण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. प्रस्ताव तयार करण्यापासून बिले देण्यापर्यंत अडचणींचा पाढाच वाचला जात आहे. अधिकाºयांना प्रोत्साहनच मिळत नसून त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण केले जात असून त्याचा परिणाम कामावर होत आहे.राजीनामे द्यायची इच्छाअनेक अधिकाºयांनी काम करण्यामध्ये स्वारस्य राहिलेले नाही. राजीनामा देवून पालिकेच्या सेवेतून मुक्त व्हावे असे वाटू लागले असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. परंतु राजीनामा दिला तर काहीतरी घोटाळा केला असेल असा संशय व्यक्त करण्याच्या भीतीने फक्त दिवस ढकलण्याचे काम सुरू असल्याचे मत काही अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.दरी कमी करण्याचे आव्हानमहापालिकेमधील प्रतिनियुक्तीवरील व कायम सेवेत असलेल्या अधिकाºयांमधील दरी कमी करण्याचे आव्हान आयुक्त रामास्वामी एन. व लोकप्रतिनिधींपुढे आहे. प्रत्येक अधिकाºयाच्या मनामध्ये नक्की नैराश्य कशामुळे आले आहे, काम करण्यामध्ये आनंद का मिळत नाही, दबावाखाली अधिकारी, कर्मचारी का काम करत आहेत याविषयी संवाद साधून योग्य मार्ग काढण्याचे आव्हान सर्वांसमोर उभे राहिले आहे.
सभागृहाने अडवणूक केल्यास काम करणे अशक्य - शहर अभियंत्यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 6:22 AM