वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम; सर्दी डोकेदुखी खोकला वाढला
By नामदेव मोरे | Published: December 1, 2023 01:33 PM2023-12-01T13:33:34+5:302023-12-01T13:33:42+5:30
प्रदुषणाचाही बसतोय फटका
नवी मुंबई: वातावरणातील बदल व वाढत्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. सर्दी, डोकेदुखी, खोकला व तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
नवी मुंबईत हवेतील धुळीकणांचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक असमाधानकारक आहे. धुलीकणांमुळे व थंडीमुळे श्वसनाशी संबंधित अजार वाढत आहेत. शहरात सर्दी, डोकेदुखी, ताप थंडी च्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे खासगी व महानगर पालिका, रूग्णालयात 10 ते 15 टक्के रूग्ण वाढले असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा रूग्णांमध्ये जास्त समावेश आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडल्यावर उबदार कपड्यांचा वापर करावा असे आवाहन ही आरोग्य विभागाने केले आहे.