भविष्यनिर्वाह निधीचा अपहार
By admin | Published: December 24, 2016 03:25 AM2016-12-24T03:25:18+5:302016-12-24T03:25:18+5:30
कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात जमा न करता, त्याचा अपहार केल्याचा प्रकार
नवी मुंबई : कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात जमा न करता, त्याचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खासगी कंपनीच्या पाच संचालकांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेसर्स प्रिझम इन्फॉरमेटीस लिमिटेड या कंपनीच्या कामगारांसोबत ही फसवणूक झालेली आहे. सदर कंपनीच्या कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी जमा केला जात होता. मात्र, सन २०१०पासून आजतागायत तो भविष्यनिर्वाह निधीच्या कार्यालयात भरला नव्हता. ही बाब भविष्यनिर्वाह निधीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये आढळून आली. सदर कंपनीने कामगारांची १६ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम हडप केल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)