उरण : देशभरातील वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवार (२०)पासून बेमुदत सुरू केलेल्या चक्काजाम आंदोलनात जेएनपीटी बंदरातील ट्रान्सपोर्टरही सहभागी झाले आहेत. त्यामुळे जेएनपीटी बंदरातील आयात-निर्यात वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला असून, दररोज बंदरातून मालवाहतूक करणारी आठ ते दहा हजार वाहने रस्त्यावर धावलीच नसल्याची माहिती महाराष्टÑ राज्य हेवी वेहिकल स्टेट ट्रान्सपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली. मात्र, जेएनपीटी बंदरातील मालवाहतूक नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू असल्याचा दावा जेएनपीटी प्रशासनाकडून केला जात आहे.वाहतूकदारांना व्यवसायात अडचणीचे ठरणारे डीपीडी धोरण रद्द करा, जीएसटीअंतर्गत डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी, राज्याचा टोल आणि सेस कमी करा आदी विविध मागण्या देशभरातील वाहतूकदारांच्या आहेत. दरवर्षी २०० क ोटींपेक्षा जास्त महसूल वाहतूकदारांकडून मिळत असताना त्यांच्या वाजवी मागण्यांची पूर्तता करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने देशभरातील देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे.आंदोलनात जेएनपीटी बंदरात कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू संघटनाही उतरल्या आहेत. दररोज जेएनपीटी आणि अंतर्गत असलेल्या अन्य चारही बंदरांतून सुमारे आठ ते दहा हजार वाहने कंटेनर मालाची वाहतूक करतात. मात्र, जेएनपीटी बंदरात कंटेनर मालाची वाहतूक करणाºया विविध वाहतूक संघटना आंदोलनात सहभागी झाल्याने बंदरातील मालाची वाहतूक रोडावली आहे. मात्र, जेएनपीटी बंदरातील कंटेनर मालवाहतूक नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू असल्याचा दावा जेएनपीटी प्रशासनाने केला आहे.>संपाला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसादवाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला नवी मुंबईमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील व्यवहार सुरळीत होते. इतर मार्केटमधील व्यवहारांवर परिणाम झाला होता. एमआयडीसी व इतर ठिकाणी अवजड वाहतूक बंद होती.बंदनंतरही बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये दिवसभरामध्ये तब्बल १७३९ ट्रक, टेम्पोमधून कृषी मालाची आवक झाली होती. मार्केटमधून मुंबईमध्ये माल घेऊन जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला होता. एमआयडीसी व इतर ठिकाणच्या मालवाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र होते. पनवेल परिसरातील माल वाहतूकही बंदमुळे ठप्प झाली होती. पाच हजारांपेक्षा जास्त अवजड वाहने कळंबोली व इतर ठिकाणी दिवसभर उभी असल्याचे चित्र दिसत होते.
वाहतूकदारांच्या आंदोलनाचा जेएनपीटीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:57 AM