नवी मुंबई : शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांवर डांबरीकरण करून सुधारणा करण्यात येणार आहे. बेलापूर, ऐरोली, वाशी विभाग कार्यालयाअंतर्गत काही प्रभागातील रस्ते तसेच मोरबे धरण प्रकल्पअंतर्गत पुनर्वसित झालेल्या काही गावांमधील रस्त्यांची डांबरीकरणाने सुधारणा करण्यासाठी ८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना महासभेची मंजुरी मिळाली आहे.नवी मुंबई शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून अनेक ठिकाणच्या रस्त्यांचा पृष्ठभाग खराब झाल्याने रस्ते खडबडीत झाले आहेत. रु ग्णालये, शाळा, महाविद्यालये, रहिवासी संकुले तसेच नागरिकांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या रस्त्यांची देखील दुरवस्था झाल्याने महापालिकेच्या माध्यमातून डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये वाशी विभाग कार्यालयाअंतर्गत वाशी सेक्टर ९ व सेक्टर १२ मधील अंतर्गत रस्ते, मोरबे धरण प्रकल्पअंतर्गत पुनर्वसित झालेल्या काही गावांमधील रस्ते, बेलापूर विभाग कार्यालयाअंतर्गत नेरु ळ सेक्टर २३, २५, २८ आणि सेक्टर ४२ मधील रस्ते, ऐरोली विभाग कार्यालयाअंतर्गत ऐरोली सेक्टर ८ ए आणि सेक्टर १६ मधील रस्त्यांची डांबरीकरणाने सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ८ कोटी ४३ लाख ८५ हजारांचा खर्च होणार आहे.>रस्ते दुरुस्तीवर भरबेलापूर विभाग कार्यालयाअंतर्गत नेरु ळ सेक्टर २३, २५, २८ आणि सेक्टर ४२ मधील रस्ते, ऐरोली विभाग कार्यालयाअंतर्गत ऐरोली सेक्टर ८ ए आणि सेक्टर १६ मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांची डांबरीकरणाने सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:14 AM