राज्याच्या वित्त आॅनलाइन प्रणालीत होणार सुधारणा

By Admin | Published: May 6, 2017 06:13 AM2017-05-06T06:13:11+5:302017-05-06T06:13:11+5:30

राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या आॅनलाइन प्रणालीतील बिम्स, ग्रास, सेवार्थ, निवृत्तीवेतन, बिलपोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी

Improvements in the state's online financial system | राज्याच्या वित्त आॅनलाइन प्रणालीत होणार सुधारणा

राज्याच्या वित्त आॅनलाइन प्रणालीत होणार सुधारणा

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या आॅनलाइन प्रणालीतील बिम्स, ग्रास, सेवार्थ, निवृत्तीवेतन, बिलपोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी, अर्थवाहिनी आदी संगणकीय आॅनलाइन प्रणालीत नवीन पायाभूत सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांनंतर ही प्रणाली गतिमान होऊन, वेतन आणि निवृत्तीवेतन मिळण्यातील विलंब दूर होऊ शकणार असल्याची माहिती रायगड जिल्हा कोषागार अधिकारी के. जी. कर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
राज्यातील सर्व कोषागार कार्यालयाचे संगणकीकरण २०१२ मध्ये झाले, त्यानंतर प्रणालीमधील नवीन सुधारणा प्रथमच होत आहे. विद्यमान वित्त प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम करायचे असल्याने काही काळ ही प्रणाली बंद राहणार असल्याने वेतनदेयके, बिम्स प्रणालीतून निघणारे प्राधिकारपत्रे, बिलपोर्टल प्रणालीद्वारे तयार होणारी देयके जिल्हा कोषागारात लवकरात लवकर सादर करावीत. जेणेकरून कोषागारात सादर केलेली देयके पारित करून विनाविलंब वेतनाचे प्रदान करणे सोयीस्कर होईल, असे कर्वे यांनी सांगितले. हस्तलिखित पद्धतीने असलेल्या चलनांना पूर्वीची पद्धत उपरोक्त कालावधीत लागू राहणार आहे. मुद्रांकाची विक्री हस्तलिखित चलनांच्या अनुषंगाने करण्यात येईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी के. जी. कर्वे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रणाली बंद राहण्याचा कालावधी

बिम्स, सेवार्थ (एनपीएस, कर्जे व अग्रीम, गट ड भविष्य निर्वाह निधी), निवृत्तीवेतन, बिल पोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी, अर्थवाहिनी या प्रणाली शनिवारी, ६ मे २०१७ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून गुरु वार, ११ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. ग्रास ही प्रणाली शुक्र वार, १२ मे रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून रविवार, १४ मे रोजी संध्याकाळी
६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Web Title: Improvements in the state's online financial system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.