पाच वर्षांत तूरडाळीचे दर झाले दुप्पट, गहू, ज्वारी, बाजरीही आली तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 06:47 AM2023-07-25T06:47:32+5:302023-07-25T06:48:21+5:30

देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

In five years, the price of turdal has doubled, wheat, sorghum and bajri have also boomed | पाच वर्षांत तूरडाळीचे दर झाले दुप्पट, गहू, ज्वारी, बाजरीही आली तेजीत

पाच वर्षांत तूरडाळीचे दर झाले दुप्पट, गहू, ज्वारी, बाजरीही आली तेजीत

googlenewsNext

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीमध्ये जवळपास  दुप्पट वाढ झाली आहे. तूर डाळीचे दरही पाच वर्षात ४३ ते ६५ रुपये किलोवरून ९५ ते १३५ रुपये किलो झाले आहेत.
डाळी व कडधान्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे चणा डाळ वगळता इतर सर्वच डाळींच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली  आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये सरासरी ४ हजार टन अन्नधान्य, डाळी, कडधान्याची आवक होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कृषी माल येथे विक्रीला येत आहे. पाच वर्षांपासून अन्नधान्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाच वर्षांपूर्वी १८ ते २२ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वारी होलसेल मार्केटमध्ये २६ ते ४३ रुपये दराने विकली जात आहे. 

गहू १९ ते २२ वरून २६ ते ४२, लोकवन गहू २१ ते २५ वरून २७ ते ४० रुपये दराने विकला जात आहे. साधा तांदूळ २१ ते २७ वरून ३२ ते ४८ रुपयांवर पोहोचला आहे.

डाळी कडधान्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. मूग डाळ ५६ ते ६२ वरून ९० ते १३० रुपये किलोवर पोहोचली आहे. मसूर डाळ ३९ ते ४६ वरून ७० ते ८० रुपये किलो झाली आहे. यावर्षी जीवनावश्यक वस्तूंचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

होलसेलचे बाजारभाव

    २०१७    २०२३
बाजरी    १८ ते २२    २६ ते ४३
गहू    १९ ते २२    २६ ते ४२
लोकवन गहू    २१ ते २५    २७ ते ४०
ज्वारी    १८ ते २८    २८ ते ५५
तांदूळ    २१ ते २७    ३२ ते ४८
हरभरा डाळ    ६६ ते ७१    ५८ ते ६८
मसूर    ४१ ते ४५    ६३ ते ७८
मसूर डाळ    ३९ ते ४६    ७० ते ८०
उडीद डाळ    ६० ते ७९    ९० ते ११२
मूग    ५५ ते ७२    ८५ ते १२५
मूग डाळ    ५६ ते ६२    ९० ते १३०
तूर डाळ    ४३ ते ६५    ९५ ते १३५

डाळी, कडधान्याचा देशात तुटवडा आहे. देशात पुरेसे उत्पादन झालेले नाही. आयातही कमी होत आहे. यावर्षी पेरण्या वेळेत झालेल्या नाहीत. यामुळे अन्नधान्य, डाळींचे दर तेजीत राहतील. 
- नीलेश वीरा, संचालक, धान्य मार्केट, मुंबई बाजार समिती

Web Title: In five years, the price of turdal has doubled, wheat, sorghum and bajri have also boomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई