मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी - पी. वेलरासू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:20 AM2024-07-02T00:20:03+5:302024-07-02T00:38:48+5:30

पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

In Mumbai Graduate Constituency Adv. Anil Parab won by getting 44 thousand 784 votes says P. Velarasu | मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी - पी. वेलरासू

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी - पी. वेलरासू

नवी मुंबई :- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  64 हजार 222  मते वैध ठरली तर  3 हजार 422  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  32 हजार 112  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. 

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे 
1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)
2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772
3) योगेश बालकदास गजभिये  :- 89
4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39
5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष  :- 11
 6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464
 7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष  :- 26
 8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37

पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.
 
Web Title: In Mumbai Graduate Constituency Adv. Anil Parab won by getting 44 thousand 784 votes says P. Velarasu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.