नवी मुंबईत धोकादायक कांदा बटाटा मार्केटमधील स्लॅब कोसळला

By नामदेव मोरे | Published: July 18, 2023 11:56 AM2023-07-18T11:56:31+5:302023-07-18T11:56:45+5:30

कांदा मार्केट २००५ पासून धोकादायक बनले आहे. महानगर पालिकेनेही शहरातील अतिधोकादायक इमारतीमध्ये मार्केट चा समावेश केला आहे.

In Navi Mumbai, a slab collapsed in a dangerous onion potato market | नवी मुंबईत धोकादायक कांदा बटाटा मार्केटमधील स्लॅब कोसळला

नवी मुंबईत धोकादायक कांदा बटाटा मार्केटमधील स्लॅब कोसळला

googlenewsNext

नवी मुंबई- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केट महानगरपालिकेने अतिधोकादायक घोषीत केले आहे. मार्केटमधील सार्वजनिक वापराच्या जागेतील स्लॅब पावसामुळे कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नाही.

कांदा मार्केट २००५ पासून धोकादायक बनले आहे. महानगर पालिकेनेही शहरातील अतिधोकादायक इमारतीमध्ये मार्केट चा समावेश केला आहे. व्यापारी व बाजार समिती प्रशासनामध्ये एकमत होत नसल्यामुळे मार्केट ची पुनर्बांधनी रखडली आहे. दोन दिवसापासून नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कांदा मार्केट मधील एफ 129 या गाळ्यासमोरील स्लॅब कोसळला.मार्केट बंद असताना ही घटना घडल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही.

कादा मार्केट चे संचालक अशोक वाळुंज यानी ही घटना गंभीर आहे. महानगर पालिका, बाजार समिती व व्यापारी यांनी पुनर्बांधणीचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी केली आहे. स्लॅब कोसळण्या घटनेमुळे मार्केट मध्ये काम करणारे कामगार, व्यापारी, ग्राहक यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Web Title: In Navi Mumbai, a slab collapsed in a dangerous onion potato market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.