शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

नवी मुंबईत कचऱ्यातून गॅससह वीजनिर्मिती होणार; महानगरपालिकेची योजना

By नामदेव मोरे | Published: November 03, 2023 6:05 PM

सीएसआर निधीतून उभारणार प्रकल्प, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधून प्रतिदिन ७५० टन कचरा संकलित होतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यास प्राधान्य दिला आहे. सद्य:स्थितीमध्ये कचऱ्यातून खत, आरडीएफ निर्मिती केली जात आहे. लवकरच कचऱ्यातून गॅससह वीजनिर्मिती करण्यात येणार असून, हा संपूर्ण प्रकल्प सीएसआर निधीमधून उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधून प्रतिदिन ७५० टन कचरा संकलित होतो. यामध्ये जवळपास ३५० मेट्रिक टन ओला व ४०० टन सुक्या कचऱ्याचा समावेश आहे. तुर्भेमधील डंपिंग ग्राउंडवर या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. केंद्र शासनाने देशातील तेल कंपन्यांना सीएसआर निधीमधून कचऱ्यापासून गॅस व विद्युतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. सद्य:स्थितीमध्ये देशातील काही मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प सुरू करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. बीपीसीएल, इंडियन ऑइल, ओएनजीसी, गेल अशा कंपन्यांच्या सीएसआर निधीचा या प्रकल्पांसाठी वापर केला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्येही कचऱ्यातून गॅस व विद्युत निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

 नवी मुंबईमध्ये गॅस व विद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी ओएनजीसीने दाखविली आहे. त्यांच्या सीएसआर निधीतून हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. प्रकल्पाची क्षमता त्यापासून किती गॅस व विद्युत निर्मिती होईल याविषयीचे आराखडे तयार केले जात आहे. प्रकल्पाचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. या प्रकल्पामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे. शहर अभियंता संजय देसाई व अभियांत्रिकी विभागही या प्रकल्पाच्या नियोजनामध्ये विशेष लक्ष देत आहेत.

पर्यावरणपूरक प्रकल्पकचऱ्यातून ओएनजीसीच्या सहकार्यातून गॅस व विद्युतनिर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी महानगरपालिकेला काहीही खर्च करावा लागणार नाही. पर्यावरणाचे रक्षण होणार असून, मनपाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

कोपरखैरणेत निसर्ग उद्यान

मनपाने कोपरखैरणे सेक्टर १४ मधील डपिंग ग्राउंडच्या जागेवर निसर्गउद्यानाची निर्मिती केली आहे. परिसरात ६५ हजार वृक्षलावगड केली आहे. या परिसरामध्ये ७ ते ८ हजार नागरिक रोज सकाळी व सायंकाळी चालण्याच्या व्यायाम करण्यासाठी येत आहेत.

खतासह आरडीएफ निर्मितीमहानगरपालिकेचा तुर्भेमधील ३६ एकर भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. या ठिकाणी ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती केली जात आहे. याशिवाय औद्योगिक इंधन अर्थात आरडीएफची निर्मिती केली जात आहे. कचऱ्यावर जास्तीत जास्त प्रक्रिया करण्यावर महानगरपालिकेने भर दिला आहे.

टॅग्स :electricityवीज