शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

पनवेल मनपाच्या ताफ्यात चार वुड श्रेडींग मशीन; झाड्यांच्या फाद्यांची छाटणी करून खतनिर्मिती 

By वैभव गायकर | Published: July 05, 2024 5:08 PM

मोडकळीस आलेल्या झाडांच्या फांद्या अथवा तुटलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावणे जिकरीचे असते.

वैभव गायकर,पनवेलमोडकळीस आलेल्या झाडांच्या फांद्या अथवा तुटलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावणे जिकरीचे असते. त्यांना आग लावल्यास एक प्रकारे प्रदूषण होत असते.अशा फांद्यांचे तंत्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पालिकेने वुड श्रेडींग मशीन खरेदी केल्या आहेत.या मशीनच्या आधारे फांद्यांचे बारीक तुकडे करून त्यापासुन खत निर्मिती केली जाणार आहे.

सध्याच्या घडीला प्राथमिक स्वरूपात चार या वुड श्रेडींग मशीन खारघर सेक्टर १२ प्लॉट नंबर १,कळंबोली सेक्टर ६ ई प्लॉट नंबर २,कामोठे सेक्टर २०,आणि नवीन पनवेल सेक्टर६ प्लॉट नंबर ९ आदी ठिकाणी या मशीन बसविण्यात आल्या आहेत.झाडांच्या फांद्या कुजण्याची वेळ लागत असल्यामुळे त्या श्रेडींग मशीनद्वारे बारीक केल्यास त्याचे कंपोस्टिंग लवकर होते. त्यामुळे सदर कचऱ्याची लवकर विल्हेवाट लावण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर ४ वूड श्रेडिंग मशीन बसविण्यात आलेल्या आहेत.पालिका क्षेत्रातील उद्यानात या खताचा वापर केला जाणार आहे. १२५ मिमी आकाराचे सर्व प्रकारच्या झाडाचे या मशीनद्वारे कटिंग केले जाते. २५०० ते ३०० किलोग्राम वजनाची या मशीनची कॅपसिटी आहे.पालिकेच्या उद्यानासह इतर पर्यावरण प्रेमी संस्थांना याठिकाणी तयार होणारा खत पालिकेमार्फत पुरवता येणार आहे.प्रायोगिक तत्वावर राबविलेला हा उपक्रम आहे.आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनात यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध प्रयोग राबविले जात आहेत त्याचाच हा भाग असल्याचे उपायुक्त डॉ वैभव विधाते यांनी सांगितले.

भविष्यात पालिका क्षेत्रात इतर ठिकाणी देखील अशाप्रकारे वुड श्रेडींग मशीन बविण्याचा पालिकेचा निर्धार आहे.हि मशीन इलेक्ट्रिक पावरवर चालणारी यंत्रणा आहे.

प्रतिक्रिया -

अनेक वेळा झाडांच्या तुटलेल्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या असतात त्यांचा वाहतुकीस तसेच रहदारीस देखील अडथळा होतो.वुड श्रेडींग मशीन द्वारे या झाडांच्या फांद्यांचे व्यवस्थित तुकडे केले जाणार आहेत.त्यानंतर त्याच्यातून कंपोष्ट खत निर्मिती केली जाणार आहे.विशेष म्हणजे झाडांच्या फांद्याना लावल्या जाणाऱ्या आगीमुळे प्रदूषण रोखण्यास मदत होईल.पालिका प्रशासन अशाप्रकारे नवीनपूर्ण उपक्रम राबवत राहील.- डॉ वैभव विधाते ( उपायुक्त,पनवेल महानगरपालिका )

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिका