नवी मुंबईत 15 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेश बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:48 AM2023-04-15T11:48:32+5:302023-04-15T11:48:56+5:30
नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त 15 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.
नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत व सुरक्षित राहावी, याकरीता 15 एप्रिल 2023 रोजी दु. 14.00 वा. ते 16 एप्रिल 2023 रोजी रात्री 23.00 वा. पर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड - अवजड वाहनाच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे
दि. १५ एप्रिल २०२३ रोजीच्या दु. १४.०० वाजेपासून ते दिनांक १६ एप्रिल २०२३ च्या रात्री २३.०० वा. पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमुद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
१. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडुन ठाणे बेलापुर रोडने तसेच शिळफाटयाकडुन महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
२. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रुतगती मार्गानि ऐरोली
टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड- अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
४. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडुन गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
तसेच, सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही अत्यावश्यक सेवेतील जट-अवजड वाहनाना लागू असणार नाही, असे काकडे यांनी कळविले आहे.