शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

१० वर्षांत नवी मुंबईची लोकसंख्या होणार ४१ लाख, ठाणे खाडीसह पारसिक डोंगरामुळे हद्दवाढीच्या मर्यादा

By नारायण जाधव | Published: August 29, 2022 4:24 PM

नवी मुंबई महापालिकेने आपला बहुचर्चित विकास आराखडा प्रकाशित करून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.

नवी मुंबई :

नवी मुंबई महापालिकेने आपला बहुचर्चित विकास आराखडा प्रकाशित करून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. या विकास आराखड्यात सिडकोच्या जुन्या इमारतींसह टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील झोपड्यांच्या जागांवर निवासी वसाहती उभारण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे येत्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या किमान २८ लाख ते कमाल ४१ लाखांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज विकास आराखड्यात बांधला आहे.

महापालिकेची हद्द मर्यादित आहे. एका बाजूला ठाणे खाडीमुळे सीआरझेडचे बंधन, त्यात आता नुकताच मिळालेला रामसर क्षेत्राचा दर्जा, तर दुसरीकडे पारसिक डोंगराची भिंत. यामुळे शहराच्या आडव्या विस्तारावर मर्यादा आली आहे. मात्र, असे असले तरी तरी ३० वर्षांहून अधिक जुनी असलेली सिडकोची जुनी ९२८५६ घरे आणि शहरांतील ४८ झोपडपट्ट्यांत ४१८०५ झोपड्यांच्या जागेवर टोलेजंग वसाहती उभ्या करण्याचे संकेत विकास आराखड्यात देण्यात आले आहेत.

२००८ साली झाला होता झोपड्यांचा सर्व्हेमहापालिकेच्या २००८ च्या सर्व्हेनुसार एमआयडीसीच्या जमिनीवर २९ झोपडपट्ट्यांत २५ हजार ६१३, सिडको जमिनीवर १७ झोपडपट्ट्यांत आठ हजार ३२७ आणि महसूल विभागाच्या जमिनीवरील दोन झोपडपट्ट्यांत सात हजार ८०५ झोपड्यांचा समावेश आहे. अशा पद्धतीने शहराचा व्हर्टिकल विकास करण्यावर महापालिकेने विकास आराखड्यात भर दिला आहे.

वन विभागासह एमआयडीसीच्या जागेवर सर्वाधिक झोपड्यागेल्या २१ वर्षांत शहरांतील झोपड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वनविभागाच्या जमिनीवरही शेकडो झोपड्या वाढल्या आहेत, एमआयडीसीची मोठी जागा झोपडपट्टी माफियांनी गिळंकृत केली आहे

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत जादा चटईक्षेत्राचे गाजर२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार नवी मुंबई शहराची लोकसंख्या ११ लाख २० हजार ५४७ इतकी होती. गेल्या दहा वर्षांत त्यात सहा लाखांची भर पडल्याचा अंदाज आहे. मात्र, राज्य सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने विकासकांना विकत वाढीव चटई निर्देशांक घेण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सध्या पाच ते सहा वाढीव एफएसआयने टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. यात पुढील १२-१५ वर्षांत मोठी भर पडणार आहे. यामुळेच येत्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या कमाल ४१ लाखांपर्यंत वाढू शकते, असे संकेत विकास आराखड्याने दिले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई