नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शहरातील १४३ शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील तब्बल ५७ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे.
शंभर नंबरी शाळांमध्ये ऐरोली येथील श्रीराम विद्यालय, श्रीमती राधाबाई मेघे विद्यालय, सरस्वती विद्यालय इंग्रजी माध्यम, श्रीमती एस. देशमुख विद्यालय, सरस्वती विद्यालय मराठी माध्यम, जयहिंद विद्यालय, ज्ञानविकास संस्थेचे कोपरखैरणे येथील एस. एच. स्कूल, तेरणा विद्यालय कोपरखैरणे, तुर्भे येथील डॉ. सीताराम विश्वनाथ सामंत विद्यालय, एआयएमएफ उर्दू स्कूल, सेंट मेरी स्कूल वाशी, वाशी इंग्लिश स्कूल, सेंट लॉरेन्स हायस्कूल, फादर अँग्नेल मल्टिपर्पज स्कूल, सिक्रेट हार्ट स्कूल वाशी, सेंट झेवियर्स मराठी हायस्कूल नेरुळ, सेंट झेवियर्स इंग्रजी हायस्कूल नेरूळ, मोतीलाल नेहरू स्कूल, सेंट ऑगस्टिन स्कूल नेरूळ, तेरणा विद्यालय नेरूळ, नूतन मराठी विद्यालय, शिक्षणप्रसारक विद्यालय, एन.आर.भगत इंग्लिश स्कूल, एस.एस.स्कूल शिरवणे, शिरवणे विद्यालय माध्यमिक नेरूळ, ज्ञानपुष्पा विद्यानिकेतन मराठी माध्यम सीबीडी, ज्ञानपुष्पा विद्यानिकेतन इंगजी माध्यम, विद्याभवन माध्यमिक मराठी माध्यम, विद्याभवन माध्यमिक इंगजी माध्यम, छत्रपती शिक्षण मंडळ हायस्कूल सानपाडा, एन.एम.एम.यू. न्यू बॉम्बे सिटी घणसोली, एम.एस.पी.एम.एस. संजीवनी विद्यालय ईश्वरनगर दिघा, न्यू मॉर्डन इंग्लिश स्कूल ऐरोली, एस.बी.ओ.ए. पब्लिक स्कूल नेरूळ, साई होलिफेथ स्कूल कोपरखैरणे, ए.ई. इस्लाम अब्दुल इंग्लिश स्कूल, न्यू बॉम्बे सिटी स्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल ऐरोली, एस.एस.हायस्कूल सीवूड, टिळक इंटरनॅशनल स्कूल घणसोली, क्रिस्ट अकॅडमी कोपरखैरणे,.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यामंदिर बेलापूर, महिमा इंटरनॅशनल स्कूल कोपरखैरणे, एस.आर.मेघे विद्यालय ऐरोली, जी.जी.एज्युकेशन अकॅडमी नेरूळ, जी.एस.स्कूल फणसपाडा बेलापूर, रूपश्री विद्यालय, विश्वभारती मराठी स्कूल, माध्यमिक विद्यालय सानपाडा, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल दिघा, महापालिका माध्यमिक विद्यालय पावणे, इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल कोपरखैरणे, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल कोपरखैरणे आणि व्ही.डी.एस. पब्लिक स्कूल या शाळांचा समावेश आहे.