बालनाट्य स्पर्धेत तळमळ एका अडगळीची ला प्रथम क्रमांक सात फेटेवाला द्वितीय; वारी ठरले तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी
By नामदेव मोरे | Published: March 15, 2023 06:12 PM2023-03-15T18:12:20+5:302023-03-15T18:13:12+5:30
सात फेटेवाले नाटकास दुसरा व वारी नाटकाना तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान यांनी सादर केलेल्या तळमळ एका अडगळीची या बालनाट्याने नवी मुंबई महानगरपालिका करंडकचा मान मिळविला आहे. सात फेटेवाले नाटकास दुसरा व वारी नाटकाना तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
वाशी मधील विष्णूदास भावे नाट्यगृहात बाल नाट्य स्पर्धेची अंतीम फेरी पार पडली. या स्पर्धेत राज्यातून ३५ बाल नाट्यांनी सहभाग घेतला होता. अंतीम फेरीसाठी १५ नाटकांची निवड केली होती. शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान च्या तळमळ एका अडगळीची या बालनाट्याने रसिकांची मने जिंकली. त्यांना आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते २५ हजार रुपये रोख रक्कम व करंडक देऊन सन्मानीत करण्यात आले.
कखग पुणे या बालनाट्य संस्थेने सादर केलेल्या सात फेटेवाला व स्पेशल स्कुल नाट्य संस्थेने सादर केलेल्या वारी नाटकाला अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक देण्यात आला. संदेश विद्यालय विक्रोटी यांच्या योद्धा व नाट्य संस्कार ॲकॅडमी यांच्या जिर्णोद्धार या बालनाट्यांनी उत्तेजनार्थ पारितोषीक मिळविले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विशेष सादरीकरणाचे सर्वोत्कृष्ठ बालनाट्य पारितोषीक नाट्यस्वरूप फाऊंडेशन यांनी सादर केलेल्या ये गं ये गं परी बालनाट्याला मिळाले. सांघिक अभिनयाचे विशेष परीक्षक शिफारस पारितोषीकही तळमळ एका अडगळीची नाटकाला मिळाले.
आमदार गणेश नाईक यांनी बक्षीस वितरण करताना नवी मुंबई हे वेगळेपण जपणारे शहर असून शहरातील कलावंत व खेळाडूंमधील गुणवत्तेला वाव देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध स्पर्धा व उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. अभिनेते आस्ताद काळे यांनी महानगरपालिकेने मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
आजच्या मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. त्याला योग्य वळण देण्यासाठी बालनाट्य चळवळीतील सर्व घटकांनी सजगतेने प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. यावेळी मनपाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, मनपा सचीव चित्रा बाविस्कर, अदिती सारंगधर, श्वेता पेंडसे, रेवप्पा गुरव व इतर मान्यवर उपस्थित होते.