नव्या वर्षात नवी मुंबईकरांना मिळेल ३३२ कोटींचे अमृत, आणखी १८ प्रकल्पांना मंजुरीची प्रतीक्षा
By नारायण जाधव | Published: February 27, 2024 04:42 PM2024-02-27T16:42:12+5:302024-02-27T16:42:51+5:30
येत्या वर्षभरात त्यांना मंजुरी मिळेल, असा विश्वास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई : केंद्र शासन पुरस्कृत अमृत २ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे एकूण २९ प्रकल्प प्रस्तावित असून त्यापैकी ११ प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. यातील ४ प्रकल्प हे पाणीपुरवठा विभागाशी संबंधित असून या कामांची प्रकल्प किमत ३३२ कोटी ६० लाख रुपये आहे. केंद्र शासन व राज्य शासनाकडून या कामांकरिता ७०% अनुदान प्राप्त होणार आहे. तर १८ प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या वर्षभरात त्यांना मंजुरी मिळेल, असा विश्वास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.
तर मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या १८ प्रकल्पांना बहुतेक प्रकल्प मलनिसारण वाहिन्या आणि एसटीपींचे असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
मंजूर झालेले ११ प्रकल्प
- कोपरखैरणे सेक्टर १९ येथील धारण तलावाचे सुशोभिकरण- ११ कोटी २८ लाख ८३ हजार ७९४ रुपये
- ज्वेल ऑफ नवी मुंबईचे पुनर्ज्जीववन - २१ कोटी १५ लाख ६१ हजार ६७ रुपये
- बेलापूर सेक्टर २० आणि २५ येथे पम्पिंग स्टेशनचे बांधकाम २२ कोटी ४२ लाख ४४ हजार २७९ रुपये
- शिरवणे येथे पम्पिंग स्टेशनचे बांधकाम आणि नेरूळ सेक्टर ४ मधील पम्पिंग स्टेशनची मशिनरी बदलणे - १० कोटी ९० लाख २६ हजार ८५१
- सानपाडा येथे पम्पिंग स्टेशनचे बांधकाम आणि वाशी सेक्टर ३० मधील पम्पिंग स्टेशनची मशिनरी बदलणे - ११ कोटी ९ लाख ६८ हजार ७६१
- यादवनगर येथे नवे एसटीपी बांधणे - ७ कोटी ३८ लाख ६० हजार
- बेलापूर येथील ७.५ एमएलडी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर - ३८ कोटी ६६ लाख १ हजार
- वाशी सेक्टर ३,१२ आणि २८ येथे पम्पिंग स्टेशनचे बांधकाम करणे २६ कोटी ५१ लाख ४ हजार
- कोपरखैरणे सेक्टर १ आणि २ येथील पम्पिंग स्टेशनची मशिनरी बदलणे -दोन कोटी ९८ लाख २ हजार
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठयाकरिता स्काॅडा यंत्रणेचे ऑटोमेशन करणे - १३३ कोटी ३७ लाख ८० हजार १०५ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.