डम्पिंग ग्राउंडसाठी अपुरी जागा, उरणमध्ये कचरा व्यवस्थापनाची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:46 AM2019-01-24T00:46:56+5:302019-01-24T00:47:03+5:30

नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिदिन तयार होणाऱ्या ११ टन कच-याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Inadequate space for dumping ground, waste management exercises in Uran | डम्पिंग ग्राउंडसाठी अपुरी जागा, उरणमध्ये कचरा व्यवस्थापनाची कसरत

डम्पिंग ग्राउंडसाठी अपुरी जागा, उरणमध्ये कचरा व्यवस्थापनाची कसरत

googlenewsNext

- मधुकर ठाकूर

उरण : नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिदिन तयार होणाऱ्या ११ टन कच-याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राउंडची जागा अपुरी पडत आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जात असला तरी नागरिकांकडून त्यासाठी फारसे सहकार्य मिळत नाही. रोडवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत असून, स्वच्छतेच्या कामात लोकसहभाग वाढविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
उरण नगरपालिकेची स्थापना होऊन १६२ वर्षे झाली आहेत. २.२९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर शहर वसलेल्या शहराची लोकसंख्या २८ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. इतर सर्व शहरांप्रमाणे उरण नगरपालिकेलाही कचºयाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात दररोज ११ टन कचरा जमा होतो. यामध्ये सुका आणि ओल्या कचºयाचा समावेश आहे. कचरा व्यवस्थापनासाठी सिडको, महसूल विभागाकडे नगरपालिकेने डम्पिंगसाठी २ हेक्टर जागेची मागणी केली होती. मात्र, जागाच उपलब्ध नसल्याची कारणे पुढे करीत डम्पिंग ग्राउंडसाठी जागा देण्यास शासकीय विभागाने चालढकलपणा चालविला होता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर २००७ साली २ हेक्टरऐवजी १ हेक्टर जागा जिल्हाधिकाºयांनी उपलब्ध क रून दिली आहे. मात्र, डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात आलेली जागा अपुरी पडत असल्याने उनपला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
दररोज साठणारा ११ टन ओला, सुका कचरा उचलण्याचे काम सध्या तरी ठेकेदारी पद्धतीने केले जात आहे. यासाठी वार्षिक ९१ लाख रुपये खर्ची पडतात. ५० आणि ठेकेदाराचे ४५ सफाई कर्मचारी मिळून शहरातील कचरा उलचण्याचे काम केले जाते. सकाळच्या वेळेत कचरा उचलण्याचे काम करते. तसेच मासळी आणि भाजी मार्केटमध्ये दोन वेळा कचरा उचलला जातो. त्याशिवाय घंटागाडी फिरवून घरोघरी जाऊनही कचरा जमा केला जातो. जमा केलेला कचºयाची वाहतूक कंपार्टमेंट असलेल्या छोट्या गाड्यांनी केली जाते. दररोज जमा होणारा सुका ५.५० टन आणि ओला ५.५० टन असा एकूण ११ टन कचरा जमा करून वेगळा केला जातो. विगतवारी केलेल्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. घरोघरी जाऊन कचरा उचलला जात असला, तरी अनेक नागरिक रोडवर कचरा टाकत आहेत. कचरा वाहतुकीसाठी पालिकेची स्वत:ची वाहने नसल्यामुळे ठेकेदाराच्या मार्फत वाहने पुरविली जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत केंद्र आणि राज्याच्या मदतीने सात घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
>बायोगॅस निर्मिती करणार
ओल्या कचºयातून बायोगॅस निर्मिती करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. यासाठी बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून, लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बायोगॅस निर्माण करून त्याचा वापर इतर कारणांसाठी केला जाणार आहे.
सद्यस्थितीमध्ये ओल्या कचºयातून खतनिर्मिती केली जात असून तीन रुपये किलो दराने खताची विक्री केली जात आहे. नगरपालिकेचे मख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले की, नगरपालिकेने स्वच्छतेच्या कामावर लक्ष दिले असून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत

Web Title: Inadequate space for dumping ground, waste management exercises in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.