कोपरखैरणेत होतोय पाण्याचा अपुरा पुरवठा
By admin | Published: February 16, 2017 02:20 AM2017-02-16T02:20:12+5:302017-02-16T02:20:12+5:30
कोपरखैरणे परिसरात मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विशेषत: सेक्टर १ मधील रहिवाशांना
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विशेषत: सेक्टर १ मधील रहिवाशांना याचा अधिक त्रास जाणवत आहे. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वकल्पना न देता प्रशासनाने ही पाणीकपात केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
शहराला मोरबे धरणातून चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. मागेल त्याला पाणी या धोरणानुसार प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. इतकेच नव्हे, तर पाण्याचा स्वैर वापर टाळण्यासाठी सक्तीने जलमापक बदलण्यात येत आहेत. असे असतानाही अनेक भागात अद्याप पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. कोपरखैरणे सेक्टर १ परिसरात मागील पंधरा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सुरूवातीच्या काळात रहिवाशांनी त्याकडे लक्ष दिले नाही. परंतु सकाळ - संध्याकाळ पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे, तर यासंदर्भात संबंधित विभागाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने रहिवाशांच्या संतापात भर पडली आहे. (प्रतिनिधी)