ग्रामविकास भवनाचे उद्घाटन सोमवारी
By admin | Published: January 1, 2017 03:28 AM2017-01-01T03:28:31+5:302017-01-01T03:28:31+5:30
मागील वर्षभरापासून उद्घाटनाच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या खारघरमधील ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नववर्षात २ जानेवारी रोजी राज्याचे
पनवेल : मागील वर्षभरापासून उद्घाटनाच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या खारघरमधील ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नववर्षात २ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ग्रामविकास भवनाचे उद्घाटन होणार आहे.
खारघर सेक्टर २१ याठिकाणी भूखंड क्र मांक ७६ अ वर सिडकोने सुमारे १८ कोटी रुपये खर्चून हा बहुउद्देशीय प्रकल्प उभारला आहे . २००७ मध्ये या प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात झाली. तळमजला अधिक पाच मजले अशी या प्रकल्पाची व्याप्ती आहे. या प्रकल्पात ५०० जण बसतील एवढा मोठा प्रेक्षागृह , १०० व्यक्तींची क्षमता असलेली कार्यशाळा, दुहेरी बिछान्या असलेल्या ५७ खोल्या, १२० व्यक्तींची क्षमता असलेले मेजवानी कक्ष आणि स्वयंपाक गृह , ३३ दुकानांशी क्षमता असलेले खरेदी क्षेत्र आदी सुविधा आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता हा समारंभ पार पडणार आहे.
यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)