महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूरमधील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

By नारायण जाधव | Published: April 1, 2023 03:47 PM2023-04-01T15:47:06+5:302023-04-01T15:47:25+5:30

अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी केली पाहणी

Inauguration of newly equipped office of Maharashtra Public Service Commission at Belapur in Navi Mumbai | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूरमधील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूरमधील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

googlenewsNext

नवी मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या बेलापूर सीबीडी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते झाले. 

यावेळी आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे, सचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव सुनील अवताडे आदी उपस्थित होते. अध्यक्ष निंबाळकर यांनी अपर मुख्य सचिव श्री गद्रे यांचे स्वागत केले.

या नव्या इमारतीमुळे आयोगाच्या कामकाजाला आणखी गती येणार असल्याचे श्री गद्रे यांनी यावेळी सांगितले. लोकसेवा आयोगाच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांना गद्रे यांनी शुभेच्छा दिल्या. आयोगाचे नवीन कार्यालय त्रिशूल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर ३४, सेक्टर ११, सरोवर विहार समोर, बेलापूर सीबीडी येथे स्थलांतरित होत आहे. हे कार्यालय भाडेतत्वावर घेण्यात आली असून ११ मजली इमारत असून त्यातील ७ मजले आयोगाला देण्यात आले आहे. यामध्ये आयोगाचे अध्यक्ष, सदस्य यांच्या दालनासह मुलाखत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, मूल्यांकन कक्ष, हिरकणी कक्ष, परीक्षा विभाग, सरळसेवा विभाग, तपासणी विभाग अशा प्रत्येक विभागाला स्वतंत्र जागा या इमारती मध्ये देण्यात आली आहे. आयोगाचे स्वतंत्र कार्यालयाच्या इमारतीसाठी बेलापूर येथे जागा उपलब्ध झाली असून स्वतःच्या जागेवरील बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. 

Web Title: Inauguration of newly equipped office of Maharashtra Public Service Commission at Belapur in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.