प्राची सोनवणे , नवी मुंबईप्रदूषण, हवामानातील बदल, बदलती शीवनशैली यामुळे शहरी भागांत श्वसनाच्या आजारांत वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. नवी मुंबईत ५ ते १२ वर्षे वयोगटातील ८ टक्के मुलांना श्वसनाचे आजार झाले असून तरुणांमध्ये हेच प्रमाण १३ टक्के आहे. वोकहार्ड्ट रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात तरुणांमध्ये फुफ्फुस आणि श्वसनाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. बेलापूर, खारघर, मानसरोवर, नेरुळ, तुर्भे येथील कबुतरांची वाढलेली संख्याही श्वसनविकारांस कारण ठरत आहे. त्यांच्या पंखांमधील विषाणू आणि विष्ठेतील कवक आरोग्यास धोकादायक ठरत आहेत. जंतूसंर्ग होऊन श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील दमा पीडितांच्या संख्येत ४० टक्के वाढ झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. दमा, दिर्घकालीन दमा, श्वसनविकार या दुर्धर आजार यांचे शहरातील प्रमाण वाढले असून -हदयविकार व मधुमेह अशा आजारांच्या यादीत त्यांचा समावेश झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
शहरात दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ
By admin | Published: August 03, 2015 3:22 AM