अमुलकु मार जैनसध्या श्रावण महिना सुरू असून हा महिना हिंदू धर्मीयांमध्ये पवित्र मानला जातो. या महिन्यात रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, दहीहंडी, पतेती, पिठोरी अमावस्या, पोळा आदी सण येत असून भाद्रपदामध्ये गणपती, हरितालिका, ऋ षिपंचमी, दुर्गाष्टमी हे उत्सव साजरे होणार आहेत. या सणामध्ये फुलांना मागणी वाढणार आहे. यामुळे फु लांच्या दरांमध्ये वाढ होत आहे.रायगड जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र म होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्या बाजारपेठांमध्ये शहरी, ग्रामीण भागातील फुलांच्या दुकानांमध्ये फुले खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. श्रावण महिन्यात पूजा, अभिषेक, होमहवन आणि अन्य धार्मिक विधी करण्यात येत आहेत. सध्या बेल, फुले यांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.फूल विक्रे त्या जयश्री पाटील यांनी श्रावण मासात फुलांना मागणी वाढली असल्याचे सांगितले. फुलांच्या किमती वाढल्यामुळे हारांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा स्वस्त हार खरेदी करण्याकडे कल अधिक आहे. पावसाळ्यात माल खराब होत असल्याने मोजकाच माल आणावा लागत आहे. सध्या रायगड येथे अनेक फूलविक्रेत्यांसाठी पुणे, मुंबई बाजारातून तसेच अन्य ठिकाणाहून फुलांची आवक होत आहे. याशिवाय कोलकाता, बंगळुरूमधून शेवंती, गुजरातमधून लीली, कोल्हापूरमधून पिवळा गोंडा, गुलाब येत असतो. मागील वर्षी हारांची किंमत ३० रुपये होती, ती आता ७० रु. झाली आहे.लहान हार गेल्यावर्षी १० रु . होता तो २५ रुपये झाला आहे. गणेशोत्सव सण येणार असल्याने या काळात फुलांची मागणी देखील वाढणारआहे.
मागणी वाढल्याने फु लांचे दर गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:43 AM