नामदेव मोरे
नवी मुंबई : अर्थसंकल्पामध्ये निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यात नवी मुंबई महानगरपालिकेला सलग चौथ्या वर्षी यश आले आहे. २५ वर्षांमध्ये उत्पन्नामध्ये तब्बल २३०पट वृद्धी झाली असून, अनावश्यक खर्चाला लावलेली कात्री व काटेकोर नियोजन यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. इंडिया रेटिंग अँड रिसर्च या संस्थेनेही पालिकेस ए. ए. प्लस स्टेबल मानांकन दिले आहे. गतवर्षी पालिकेने तब्बल ४०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. मंगळवारी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी गतवर्षीच्या अर्थसंकल्पात २५५ची भर टाकून ४२७५चा सुधारीत अर्थसंकल्प सादर केला. सलग चौथ्या वर्षी उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यापूर्वी २१ वेळा सादर केलेल्या अर्थसंकल्पातील उद्दिष्ट साध्य झाले नव्हते. यामुळे सुधारीत अर्थसंकल्पात आकडे कमी करावे लागत होते. २०१३-१४ मध्ये उद्दिष्टापेक्षा १३३७ कोटी उत्पन्न कमी मिळाले होते. यामुळे महापालिकेवर प्रसारमाध्यमांसह लोकप्रतिनिधींनीही टीका केली होती. पुढील दोन वर्षेही अशीच स्थिती होती. २०१६-१७ मध्ये तत्कालीन आयुक्त व प्रशासनाने वास्तववादी अर्थसंकल्प सादर करून उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित केले. अनावश्यक खर्च बंद केले. ज्या प्रकल्पांची गरज आहे त्याच प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले. विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या. यामुळे पहिल्यांदा निश्चित उद्दिष्टापेक्षा तब्बल १०५ कोटी जादा उत्पन्न मिळाले. सर्वच अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमामुळे हे यश मिळविणे शक्य झाले.
महापालिकेने १९९५-९६ मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला. ७९ कोटी ३४ लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. पण प्रत्यक्षात १८ कोटी ५८ लाख रुपयेच महसूल मिळू शकला होता. नंतरच्या २५ वर्षांमध्ये सर्वांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ४२७५ कोटींपर्यंत उद्दिष्ट गाठण्यापर्यंत मजल मारता आली आहे. उत्पन्नामध्ये २३०पट वाढ झाली असून, या कालावधीमध्ये देशाचे लक्ष वेधणारी अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावता आली आहेत. शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोरबे धरण विकत घेण्यात आले. भव्य मुख्यालय, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, शास्त्रोक्तपद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, उद्यान व्हिजन, शाळा व्हिजन, तलाव व्हिजन राबविण्यात आले. स्वच्छता अभियानामध्ये महापालिकेने देशपातळीवर ठसा उमटविला आहे. ठाणे-बेलापूरसह एमआयडीसीमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक नोडमध्ये जास्तीत जास्त उद्याने विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक घडी उत्तम असल्यामुळे ही कामे करता आली.अभय योजनेचाही फायदाच्नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीसाठी अभय योजना जाहीर केली आहे. यामुळे या वर्षी उत्पन्नामध्ये १८० कोटी रुपयांची भर पडली आहे. या योजनेचाही उत्पन्न वाढविण्यासाठी फायदा झाला आहे. या योजनेचा जास्तीत जास्त थकबाकीदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.अत्यावश्यक कामांना प्राधान्यच्महानगरपालिकेने चार वर्षांपासून अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिले आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सुचविलेल्या कामांची शहानिशा केली जात आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व यापूर्वीच्या दोन्ही आयुक्तांनी घटनास्थळी जाऊन कामाची आवश्यकता आहे का, हे पाहण्यास प्राधान्य दिले आहे. अनावश्यक कामे बंद करून अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिले आहे. यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे.महापालिका आयुक्त, सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या परिश्रमामुळे महापालिकेने सलग चौथ्या वर्षी अर्थसंकल्पातील उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळविले आहे. वास्तववादी अर्थसंकल्प सादर करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन केल्यामुळे हे शक्य झाले असून, यामध्ये सर्वांचे योगदान आहे.- धनराज गरड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिकावर्षनिहाय अर्थसंकल्प व प्रत्यक्ष महसुलाचा तपशील (आकडे कोटींमध्ये)वर्ष उद्दिष्ट प्रत्यक्ष फरक१९९५-१९९६ ७९.३४ १८.५८ ६०.७६१९९६-१९९७ ९५.३६ ३७.०२ ५८.३४१९९७-१९९८ १२६.८७ ५५.३४ ७१.५३१९९८-१९९९ १९८.२५ १०१.८५ ९६.४१९९९-२००० २५३.१५ १३५.२७ ११७.८८२०००-२००१ २८०.४७ १९९.७३ ८०.७४२००१-२००२ २९०.२२ २०९.७२ ८०.५२००२-२००३ २७४.६६ १८४.७८ ८९.८८२००३-२००४ ४६८.२६ २९०.४९ १७७.७७२००४-२००५ ३९२.१३ ३११.८६ ८०.२७२००५-२००६ ५४९.४० ३३९.२४ २१०.१६२००६-२००७ ६३६.८५ ५३०.४६ १०६.३९२००७-२००८ ७५२.४१ ५३०.३५ २२२.०६वर्ष उद्दिष्ट प्रत्यक्ष फरक२००८-२००९ १४२६.८७ ६५०.५४ ७७६.३३२००९-२०१० १३७५.२३ ९१६.२७ ४५८.९६२०१०-२०११ १६५४.७५ १०७२.५६ ५८२.१९२०११-२०१२ १९३५.३५ १०२७.१८ ९०८.१७२०१२-२०१३ २२००.०९ ११९७.५८ १००२.५१२०१३-२०१४ २६८०.४३ १३४२.८९ १३३७.५४२०१४-२०१५ २०९९.८५ १४२१.७५ ६७८.१२०१५ - १६ १९५६.९३ १८७७.६२ ७९.३१२०१६ - १७ २०२४.१० २१३०.०४ १०५.९४२०१७ - १८ २९८७.२ ३०३१.८७ ४४.६७२०१८ - १९ ३६७१.०३ ३७५६.४१ ८५.३८२०१९ - २० ४०२०.१३ ४२७५.३१ २५५.१८