पनवेलमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:26 PM2019-12-15T23:26:06+5:302019-12-15T23:26:09+5:30

महिलेला अटक : भाड्याने खोली देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

An increase in the number of Bangladeshi infiltrators in Panvel | पनवेलमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या संख्येत वाढ

पनवेलमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या संख्येत वाढ

Next

मयूर तांबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेलसह ग्रामीण भागातही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवार्इंवरून दिसून येत आहे. शुक्रवारी, खांदेश्वर पोलिसांनी नवीन पनवेल शहरातून एका बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. सोनाली अब्दुल खुददुस खान (२७) असे तिचे नाव आहे.


पनवेल परिसरात मोट्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत आहेत. जास्त भाडे मिळते म्हणून काही नागरिक त्यांना घर भाड्याने देतात. मात्र, कोणत्याही कागदपत्राविना भाड्याने रूम देणे, हे धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पनवेल, उरण, नवी मुंबई या भागांत बांगलादेशी नागरिकांची संख्या जवळपास दहा हजारांच्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना स्वगृही पाठवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. परिसरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असल्याने तिथे मजूर म्हणून हजारो लोक काम करतात. या ठिकाणी बांगलादेशींना रोजगार मिळतो. तर बांगलादेशी महिला घरकाम करतात. कमी पैशात त्या काम करत असल्याने घरकामासाठी त्यांना ठेवण्याचे प्रमाण मोठे आहे. बांगलादेशी नागरिक पनवेल व आजूबाजूच्या परिसरात बांधकाम साइटवर बिगारी म्हणून काम करत आहेत. यातील काही नागरिकांनी बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून बेकायदा घुसखोरी करून भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे. सुरक्षारक्षक, घरकामगार महिला, बारमध्ये काम करण्यास महिलांमध्ये बांगलादेशींचे प्रमाण जास्त आहे. मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी तीन वर्षांपूर्वी खारघर येथे बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यास गेले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्यात दोन अधिकारी जबर जखमी झाले होते. स्थानिक पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे हे प्रमाण वाढले आहे.


काही दिवसांपूर्वी चिखले येथे सापडून आलेल्या ईनामूल मुल्ला याच्याकडे शासकीय कार्ड व दाखले सापडले आहेत. बांगलादेशी नागरिकांना पॅन कार्ड व आधार कार्ड बनवून देणारे काही दलाल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाºया खोलीमालकावर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.


डिसेंबर २०१५ मध्ये मोठा खांदा गावात ३२ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. २०१६ मध्ये चार बांगलादेशींना डेरवली येथून अटक करण्यात आली होती. डिसेंबर २०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या आय शाखा व कळंबोली पोलिसांनी रोडपाली येथील एका चाळीत मंगळवारी धाड टाकून बेकायदेशीर राहणाºया जुबेर शेख (२६), यासीन रफीकुल इस्लाम शेख (२३), अन्वर नुर महम्मद शेख (२३), सलिमा अन्वर शेख (२२), जोगुरा आश्रफउल आलम शेख (३०) या दोन पुरुष व तीन महिलांना अटक केली होती. जानेवारी २०१९ मध्ये तालुका पोलिसांनी जाकीर मौजूर शेख (४०, नेरे), नजमुल इमान शेख (२९, कामोठे), शोबुज शिराज सरदर (२९, बेलापूर), अलमगीर नूर मोहम्मद शेख (२८, नेरे), यासीन अराफात शेख (२०, पारगाव), हबीब मलिक शेख (३५, कोपरा) या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली. फेब्रुवारी २०१९ मध्ये जुई कामोठे येथे बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाºया मरजीना उर्फ पूजा गोपाळ गजमेर (४०), नितीन गोपाळ गजमेर (१८), प्रीतीन गोपाळ गजमेर (१९) या तिघा बांगलादेशी नागरिकांना कामोठे पोलिसांनी अटक केली. नोव्हेंबर २०१९ मध्ये धाकटा खांदा भागात बेकायदा वास्तव्यास असलेल्या शमशुल अबुबकर शेख (५०), मुस्ताहिन तकुब्बर फकीर (२३), राजू चाँद मुल्ला (२८), जनातुल शमशुल शेख (१९), शकील खशरुल मुल्ला (१९), जहिरुल अस्लम खान (२२) आणि नाहिम तकुब्बर फकीर (२१), नजमूल अब्दुल सत्तार शेख (३२), मोहिदूल इकलाज गाझी (४०) आणि मोहम्मद नुरइस्लाम रशीद सिद्धर (३१) या दहा बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली. नोव्हेंबर २०१९ मध्ये कळंबोली पोलिसांनी आलमगिर अब्दुलसत्तार शेख, (४५), मिराज आमलगिर शेख (२१), सिराज आलमगिर शेख,(२०), निमा सिराज शेख, (१७), रियाज आलमगिर शेख, (१६), रिना मोहम्मद शकील शद्दल (२३), सलमा बेगम युनुस काजी (४०) या सात बांगलादेशींना अटक केली होती. बांगलादेशी नागरिकांवर कारवाई होऊनदेखील त्यांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे.

पाच वर्षांपासून पनवेलमध्ये महिलेचे वास्तव्य
च्नवीन पनवेल येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाºया सोनाली अब्दुल खुददुस खान (२७) महिलेला खांदेश्वर पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी अटक केली आहे.
च्नवीन पनवेल सेक्टर ६ येथे एक बांगलादेशी महिला बेकायदेशीर राहत असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता सोनाली खान हिला ताब्यात घेतले.
च्गेल्या दहा वर्षांपासून ती भारतात राहत असून, पाच वर्षांपासून नवीन पनवेलमध्ये राहत आहे. तिच्याकडे भारतात राहत असल्याची कोणतीही कागदपत्रे सापडून आलेली नाहीत. तिला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An increase in the number of Bangladeshi infiltrators in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.