उरणमध्ये सर्पमित्रांच्या फोन कॉल्समध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:34 AM2019-11-13T00:34:48+5:302019-11-13T00:34:51+5:30
मानवी वस्तीत आढळून येणाऱ्या सापांना रेस्क्यू करून घेण्यासाठी उरणमधील नागरिकांकडून येणा-या सर्पमित्रांच्या फोन कॉलच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली
मधुकर ठाकूर
उरण : मानवी वस्तीत आढळून येणाऱ्या सापांना रेस्क्यू करून घेण्यासाठी उरणमधील नागरिकांकडून येणा-या सर्पमित्रांच्या फोन कॉलच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, दररोज दहा-बारा फोन घेण्याची पाळी परिसरातील सर्पमित्रांवर येऊन ठेपली असल्याची माहिती सर्पमित्र राजेश नागवेकर यांनी दिली.
विकासाच्या नावाखाली निसर्गाचा प्रचंड प्रमाणात होत चाललेला ºहास आणि त्यामध्ये आता लांबलेल्या परतीच्या पावसाची भर पडली असल्याने नैसर्गिक आवास सोडून मानवी वस्तीत आढळून येणाºया सापांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
उरण, पेण, पनवेल आदी परिसरातून नागरिकांकडून दररोज येणाºया सर्पमित्रांच्या फोन कॉलच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. परिसरातून दररोज तीन-चार फोन येत असल्याची माहिती फ्रेंड आॅफ नेचर संघटनेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी दिली.
शेतात आढळून येणारे उंदीर, बेडूक, मासेही सापांना मिळेनासे झाले आहेत. शेतकरी पिकलेले धान्य घरी घेऊन आले आहेत. घरात ठेवलेल्या अन्नधान्यांवर उंदीर, घुशी येत असल्याने विषारी, बिनविषारी अशा विविध जातींचे साप आता भक्ष्यांच्या शोधार्थ नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
पाऊस पडल्यानंतर साप शरीरातील तापमान राखण्यासाठी उन्हात बाहेर पडतात. शेत कापणीनंतर नागरी वस्तीत साप आढळून येतात. यामध्ये मागील महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती सर्पमित्र राजेश नागवेकर यांनी दिली.
नुकतेच परिसरातून सर्पमित्रांनी नाग, अजगर, मण्यार आदी जातींचे साप मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीतून रेस्क्यू केले आहेत. सर्पमित्र जयवंत ठाकूर, रघुनाथ नागवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिताफीने पकडलेल्या सापांना वनविभागाच्या कर्मचाºयांच्या मदतीने जंगलात सोडून जीवदान दिले आहे. खेडोपाड्यात सर्पदंश झालेल्यांनाही तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची मोलाची कामगिरीही सर्पमित्र बजावित असतात. मंगळवारी पुण्याच्या दिशेने वाटचाल करीत असतानाच आंबांडे-भोर येथील खोपडे या वृद्धेला विषारी सापाचा दंश झाल्याचा फोन आला. फोन कॉलला त्वरित प्रतिसाद देत जयवंत ठाकूर यांनी वृद्धेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.
उरणमध्येच सर्पमित्र आणि निसर्गप्रेमींच्या तीन संस्था कार्यरत आहेत. या तीन संस्थांचे सुमारे १५०हून अधिक सदस्य आहेत. या संस्था आणि सदस्यांकडून वन्यजीवांच्या संरक्षणाचे आणि जनजागृतीचेही काम केले जाते, तेही विनामोबदल्यात हे विशेष.