- प्राची सोनवणे नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून पालेभाज्या, गाजर, हिरवी मिरची यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ५ ते १० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या आहेत. पुढील कालावधीत भाज्या स्वस्त असतील, असा अंदाज घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. गुरुवारी घाऊक भाजीपाला बाजारात एकूण ६४० गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये कोबी, फ्लॉवर, गाजर, हिरवी मिरची तसेच पालेभाज्यांमध्ये पालक, शेपू, कोथिंबीर, मेथी, कांद्याची पात या भाज्या जास्त प्रमाणात बाजारात दाखल झाल्या आहेत.जोधपूर, इंदूरसह नाशिकमधील बाजारात गाजर दाखल होण्यास सुरुवात झाल्याने आवक वाढली आहे.तसेच हिरवी मिरची हैद्राबाद, कर्नाटक आणि फरसबी नाशिक, पुणे येथून दाखल होत आहे. तर नाशिक, पुणे भागातून हिरव्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. पुढील कालावधीत पालेभाज्या आणि गाजर, कोबी, फ्लॉवर या भाज्यांचे दर कमी राहतील,असा अंदाज घाऊक व्यापाºयांनी व्यक्त केला. ही आवक अखेरीस कमी होणार असल्याची शक्यता देखील व्यापाºयांकडून वर्तविण्यात आली आहे. शाळेला सुट्ट्या सुरू झाल्या की मागणी कमी होणार अशी प्रतिक्रिया व्यापाºयांनी व्यक्त केली.गेल्या वर्षी पाऊस उशिराने सुरू झाला त्यामुळे उत्पादन लांबले आणि त्यामुळे उष्णतेमध्येही मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.जेवढी मागणी तेवढा पुरवठा असे गणित जुळून आले आहे. मात्र, उत्पादक भरडला जात असून, उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याची खंत घाऊक भाजीपाला महासंघाचे सचिव प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. उत्पादनाचा खर्च वाढत असून, माल मात्र त्या दरात विकला गेला पाहिजे, तरच उत्पादकांचा खरा फायदा होईल. उत्पादन घेणे स्वस्त झाले तर नक्कीच शेतकºयांचा फायदा होईल.अधिक उत्पादनासाठी खत टाकण्यात आले. असे असले तरी, भाजीपाल्याचे दर कवडीमोल असल्याने लागवड खर्च निघणेही कठीण असल्याची प्रतिक्रि या शेतकरी विजय दुधे यांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात बाहेरील राज्यातून शेतमाल आल्याने दर घसरले. याचा फटका महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांना बसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.>गवार- २४०० ते ३४००कारले - १८०० ते २८००कोबी - ५०० ते ७००शिमला मिरची - १६०० ते २२००तोंडली - १५०० ते २०००वांगी - १००० ते १२००फरसबी - ३००० ते ३६००चवळी शेंग - १६०० ते २६००भेंडी - ३००० ते ३४००
भाज्यांंची आवक वाढली, मागणी व पुरवठ्याचे गणित जुळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 2:46 AM