रायगड जिल्ह्यातील तापमानात वाढ
By admin | Published: March 30, 2017 06:44 AM2017-03-30T06:44:27+5:302017-03-30T06:44:27+5:30
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सन २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे.
जयंत धुळप /अलिबाग
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सन २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याकरिता याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे १५ तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. ३५ अंश.से. अशा अधिकतम तापमानाने माणगाव,महाड व पोलादपूर तालुक्यांतील जनता हैराण झाली आहे.
बुधवारी जिल्ह्यात पेण, खालापूर व कर्जत येथे ३२, पनवेल येथे ३१, अलिबाग, मुरुड, उरण, म्हसळा, तळा व रोहा येथे ३०, पाली-सुधागड, श्रीवर्धन येथे २९ अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरान येथे २८ अंश से. तर महाबळेश्वर येथे २५ अंश. से. तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात अन्यत्र रत्नागिरी ३१,चिपळूण ३३ तर कणकवली येथे ३२ अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताची शक्यता अधिक असते. त्यामुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
उष्माघातापासून संरक्षण करण्याकरिता काय करावे?
च्जास्तीत जास्त पाणी प्यावे.
च्हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
च्बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.
च्प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
च्जर उन्हात काम करीत असाल तर डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
च्ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.
च्अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत.
च्चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.हलगर्जीपणा करू नये.
च्वैयक्तिक कार्यवाहीसोबतच घरातही तसेच वातावरण हवे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
च्रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
च्पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
च्पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.
उष्माघात प्रसंगी काय करू नये?
च्लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
च्दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
च्गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
च्बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
च्दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.
च्उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.
च्मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात याव्यात.