बाप्पाच्या मिरवणुकींत ढोल-ताशांची वाढतेय क्रेझ

By Admin | Published: September 13, 2016 02:45 AM2016-09-13T02:45:38+5:302016-09-13T02:45:38+5:30

ध्या डॉल्बी, साऊंड सिस्टीम संस्कृतिला बाजूला सारत ढोल-ताशा पथकांची वाजंत्रीचा नवा फॅड तरूणाईमध्ये आहे. पुणे-मुंबई अशा कसलेल्या निष्णात ढोल-ताशे पथकाचे संचलनाची दृश्ये

Increasing curves of drums and cards in Bappa's procession | बाप्पाच्या मिरवणुकींत ढोल-ताशांची वाढतेय क्रेझ

बाप्पाच्या मिरवणुकींत ढोल-ताशांची वाढतेय क्रेझ

googlenewsNext

पेण : सध्या डॉल्बी, साऊंड सिस्टीम संस्कृतिला बाजूला सारत ढोल-ताशा पथकांची वाजंत्रीचा नवा फॅड तरूणाईमध्ये आहे. पुणे-मुंबई अशा कसलेल्या निष्णात ढोल-ताशे पथकाचे संचलनाची दृश्ये वाहिन्यांवर गणपती आगमनासह विसर्जन मिरवणुकामध्ये पहावयास मिळतात. महानगरांचे हे ढोल-ताशे पथकाचे फॅड शहराच्या वेशीवर पोहचून चांगलेच बाळसं धरू लागले आहे. लयबध्द तालावर एकाच रांगेत एकसारख्या पेहरावातील ढोल-ताशे पथकात आपलीच मुले जेंव्हा उत्साहाने वाजंत्री वाजवितात तेंव्हा त्याचा मनमुराद आनंद पालकांसह शहरातील मित्रपरिवार घेतात. पेण शहरात ढोल-ताशा पथकाचं सादरीकरण येत्या साखरचौथ गणरायांच्या आगमनाप्रसंगी होणार असून त्या ढोल-ताशे पथकाचे १०० सभासद यासाठी जीवापाड मेहनत घेऊन सराव करत आहेत.
गणेशोत्सवात ढोल-ताशा पथक असणे ही सध्या नवी ओळख बनत आहे. सणवारात चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा, ग्रामदैवतांचे उत्सव, नवरात्री, गणेशोत्सव तथा राष्ट्रीय सणाच्या रॅली प्रसंगी या पथकाची उणिव भासू नये यासाठी पेण गणेश मूर्तीकारांच्या कासार आळीतील महाकाली हॉल व मंदिरासमोरील जागेत सध्या ढोल-ताशे पथकाचा सराव सुरू आहे. महिला ४० व पुरूष ७० असे मिळून ११० ते १२५ च्या घरात सदस्य नोंदणी झाली असून ड्रेसकोड, वाजंत्रींची साधने, ४० ढोल, १० ताशे व इतर अनुरूप वाजंत्री साहित्यांनी सज्ज असलेले ढोल पथक साखर चौथ गणरायांच्या आगमनापासून पेणमध्ये कार्यरत होणार आहे.
पारंपरिकता जपून कमरेला ढोल-ताशे बांधणे, वाद्यांची ने-आण करण्याची सर्व कामे कशी करावी, मिरवणुकांमध्ये शांततापूर्ण वातावरण कसे ठेवावे हे प्रशिक्षण ही मुलं घेत आहेत असे प्रकल्प मार्गदर्शक धनश्री सचीत समेळ या दाम्पत्यांनी सांगितले.

Web Title: Increasing curves of drums and cards in Bappa's procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.