आंतरराष्ट्रीय ड्युबॉल स्पर्धेत भारताला सुवर्ण
By admin | Published: February 7, 2017 04:12 AM2017-02-07T04:12:55+5:302017-02-07T04:12:55+5:30
नेपाळ ड्युबॉल फेडरेशनच्या वतीने नुकतेच इंडो-नेपाळ इंटरनॅशल ड्युबॉल सिरीज फॉर मेन अॅण्ड वूमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
नवी मुंबई : नेपाळ ड्युबॉल फेडरेशनच्या वतीने नुकतेच इंडो-नेपाळ इंटरनॅशल ड्युबॉल सिरीज फॉर मेन अॅण्ड वूमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भारतीय संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. संघात नेरूळमधील सेंट झेवियर्स शाळेतील सात खेळाडूंचा सहभाग होता. पोखरा, नेपाळ येथे झालेल्या या स्पर्धेत चुरशीची लढत देत मुलींच्या संघाने खुल्या गटात बाजी मारली.
ड्युबॉलमध्ये ७ खेळाडूंचा सहभाग असतो. यात सरावाबरोबरच प्रचंड स्टॅमिनाची गरज असते, अशी माहिती प्रशिक्षक जयदीप राजपूत यांनी दिली. नेरूळमधील सेंट झेविअर्स शाळेतील विद्यार्थ्यांना या खेळाचे विशेष प्रशिक्षण दिले जात त्यांच्याकडून नियमित सरावही करून घेतला जातो.
ड्युबॉल हा खेळ तीन वर्षांपूर्वीपासून खेळला जात असून अजूनही नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना या खेळाबाबत फारशी माहिती नाही. मात्र आगामी काळात हा खेळ प्रत्येक मैदानावर खेळला जाईल, इतकेच नव्हे राज्यातही या खेळाला विशेष महत्त्व प्राप्त होईल, असे राजपूत यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय ड्युबॉल फेडरेशनचे सदस्य फिरोज खान यांनीही झेवियर्स शाळेच्या खेळाडूंचे कौतुक करत खेळाविषयी मार्गदर्शन केले. शाळेतील खेळाडूंना स्पर्धेनिमित्त बाहेरगावी जावे लागत असून त्या दरम्यानचा अभ्यासक्र म भरून काढण्याकरिता शाळेचे विशेष योगदान असल्याची प्रतिक्रि या पालक सतीश पवार यांनी दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा अंदानसरे स्वत: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देत असून खेळाडूंकरिता विशेष शिकवणीचे आयोजन केले जाते.
भारतीय संघात नेरूळमधील झेविअर्स शाळेतील खेळाडू हेतीशा पवार, स्मृती सिंग, धन्या पुजारी, नूपुर अमकर, श्रावणी माने, नाहेल शेख आणि मुलांच्या गटात मंदार अपरदेशी यांचा सहभाग होता. शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.