शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

उन्हाळ्यात महागाईचा चटका, डाळी,कडधान्याचे दर कडाडले  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 9:08 AM

तुटवडा सुरू; तीन महिन्यांत ३ ते ७ टक्के दर वाढले, आयातही मंदावली

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशात डाळी, कडधान्यांचे उत्पादन कमी झाले असून, आयातही मंदावली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. तीन महिन्यांत प्रत्येक वस्तूंचे दर ३ ते ७ टक्के वाढले आहेत. घाऊक बाजारामध्ये मसूरडाळीनेही शंभरी ओलांडली आहे. उन्हाळ्यामध्येच तेजी सुरू झाल्यामुळे संपूर्ण वर्षभर ही भाववाढ सुरू राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गहू, तांदूळ उत्पादनामध्ये भारत स्वावलंबी झाला आहे. परंतु, कडधान्याच्या बाबतीत अद्याप आत्मनिर्भर होता आलेले नाही. देशवासीयांना वर्षभर पुरेल एवढ्या कडधान्याचे उत्पादन होत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. 

गतवर्षी उत्पादन घटले व आयातही कमी प्रमाणात होत असल्यामुळे २०२४ च्या सुरूवातीपासून डाळी, कडधान्यांचे दर वाढण्यास सुरूवात झाली आहे. फेब्रुवारीमध्ये ७० ते ७८ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या मसूरडाळीचे दर ७१ ते ११५ रुपयांवर पोहोचले आहेत. हरभरा डाळ ६५ ते ७८ वरून ६८ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात आहे.  बाजार समितीमध्ये सर्व प्रकारच्या डाळी व कडधान्यांची प्रतिदिन ८०० ते ९०० टन आवक होत आहे. यावर्षी पाऊस वेळेत पडला तर दर स्थिर राहतील. वेळेत पेरणी झाली नाही तर वर्षभर दर वाढत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तीन महिन्यांत चणाडाळ ३ टक्के, चणे ६.५ टक्के, मूगडाळीच्या दरात ३ टक्के वाढ झाली आहे.

देशांतर्गत कडधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. आयातही कमी होत असल्यामुळे दर वाढण्यास सुरूवात झाली आहे. पुढील वर्षभर दरामध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. - नीलेश विरा, संचालक, धान्य मार्केट 

मुंबई बाजार समितीमधील बाजारभाव (प्रतिकिलो) वस्तू    फेब्रुवारी    एप्रिल 

  • हरभरा    ६० ते ८०    ६० ते ८५
  • हरभरा डाळ    ६५ ते ७८    ६८ ते ८५
  • मसूर     ६४ ते ७५    ६५ ते ८५
  • मसूर डाळ     ७० ते ७८    ७१ ते ११५
  • उडीद     ७० ते ११२    ८३ ते ११५
  • उडीदडाळ     ९५ ते १४०    १०० ते १५०
  • मूग     ८८ ते ११६    ९५ ते १५०
  • मूगडाळ    ९५ ते १४०    ९९ ते १४०
  • तूरडाळ    ९२ ते १७०    ११० ते १७० 
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईInflationमहागाई