इन्फ्लुएंझा लहान मुलांसाठी ठरतोय धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 01:01 AM2019-06-30T01:01:22+5:302019-06-30T01:02:25+5:30
इन्फ्लुएंझा हा शब्द इटालियन भाषेतील शब्दावरून आला असून, त्याला ‘फ्लू’ या नावानेही ओळखले जाते.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : इन्फ्लुएंझा हे व्हायरस असून त्याची श्वासोश्वासामार्फत लागण होते. हा एक मानव, पशू, पक्ष्यांमध्ये आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. किडनी, लिव्हर हृदय संबंधित आजार असलेल्या लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांच्यासाठी हा आजार धोकादायक ठरत असून, या आजाराची माहिती व घ्यावयाची काळजी याविषयी भारतीय बालचिकित्सक अकादमीचे अध्यक्ष
डॉ. विजय येवले यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : इन्फ्लुएंझा म्हणजे काय?
उत्तर : इन्फ्लुएंझा हा शब्द इटालियन भाषेतील शब्दावरून आला असून, त्याला ‘फ्लू’ या नावानेही ओळखले जाते. फ्लूचे आणखी व्हायरस असून, त्यामध्ये ताप, डोकेदुखी सारखे आजार होतात; परंतु इन्फ्लुएंझा (फ्लू) मध्ये जास्त प्रमाणावर ताप येऊन फ्लूचा निमोनिया होण्याची शक्यता जास्त प्रमाणावर असते.
प्रश्न : इन्फ्लुएंझा टाळण्यासाठी काय करता येऊ शकते?
उत्तर : एखाद्या रोगजंतूंची लागण झाल्यावर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते, त्यानंतर साधारण त्या रोगजंतूंची लागण पुन्हा त्या व्यक्तीला होत नाही; परंतु फ्लू हा स्मार्ट असून प्रत्येक वेळी रचना बदलतो त्यामुळे शरीरात तयार झालेली रोगप्रतिकार शक्ती लागू पडत नाही. नवीन व्हायरसला लागू पडेल अशी लस दरवर्षी नव्याने तयार केली जाते व बाजारात उपलब्ध असते.
प्रश्न : आजाराचा प्रसार कसा होतोे?
उत्तर : हा आजार शिंकण्यातून उडलेले कण श्वासाद्वारे अथवा तोंडाद्वारे दुसऱ्याच्या शरीरात जाणे, रोग्याच्या शिंकेतील, खोकल्यातील अथवा थुंकीतील अतिशय छोट्या कणांचा श्वासाद्वारे संसर्ग, दूषित पृष्ठभागांद्वारे हाताशी, नाकाशी वा तोंडाशी होणाºया स्पर्शाद्वारे या आजाराचा संसर्ग होतो.
प्रामुख्याने कोणत्या व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे?
सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे या संसंर्गजन्य आजाराची लागण लहान मुलांना तत्काळ होऊ शकते. किडनी, लिव्हर, हृदयाचे आजार, गरोदर स्त्रिया, लठ्ठपणा, मधुमेह यासारखे आजार असणाºया कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना फ्लू झाला तर ते गंभीर ठरू शकते. फ्लूची लस परिणामकारक असून त्यामुळे निमोनिया सारख्या आजारापासून संरक्षण होऊ शकते.
उपाय
- आजारी असलेल्या लोकांपासून दूर राहणे
- आपण आजारी असाल तरी घरीच थांबा
- सतत आपले हात साबण लावून धुणे
- शिंकताना व खोकताना हात रुमालाचा वापर करा
- सार्वजनिक जागेत थुंकू नका
बाजारात उपलब्ध असलेल्या परंतू शासनामार्फेत दिल्या जात नसलेल्या विविध लसींचा व आजाराच्या स्वरूपाचा अभ्यास करून कोणती लस किती फायदेशीर आहे हे इंडियन अकादमी आॅफ पीडीएट्स यांच्या मार्फत तपासले जाते. - डॉ. विजय येवले