शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

उलवेमध्ये पायाभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:25 AM

सीवूड्स-उरण या मार्गावरील सिडकोनिर्मित उलवे नोडचा विकास झाल्याने येथील रहिवाशांची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे.

प्राची सोनवणेनवी मुंबई : सीवूड्स-उरण या मार्गावरील सिडकोनिर्मित उलवे नोडचा विकास झाल्याने येथील रहिवाशांची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे. मात्र दळणवळणाची साधने, पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. नोडमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने येथे नागरीकरणाने वेग घेतला असून सिडकोने इतर दळणवळणाची साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.गटाराची उघडी झाकणे, उखडलेले रस्ते, पदपथ, खेळासाठी मैदाने तसेच उद्यानाचा अभाव, आरोग्य सुविधा, फळ-भाजीपाल्यासाठी मंडईची कमतरता, डासांचा प्रादुर्भाव आदी समस्यांनी उलवे नोडमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी प्रत्येक नोडमध्ये अपूर्ण कामांमुळे जागा अडविली असून त्यामुळे परिसरात पसरणाºया धुळीच्या साम्राज्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कामाचे साहित्य रस्त्यावर तसेच पडून राहिल्याने मुख्य रस्त्याची अडवणूक झाली असून नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करून देण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या असून प्रत्येक नोडमधील अंतर्गत रस्ते, नागरी सुविधांच्या बाबतीत मात्र सिडकोने हात वर केले आहेत.उलवे परिसरात ठिकठिकाणी उघडी गटारे पाहायला मिळतात. याकडे मात्र गांभीर्याने लक्ष न घातल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्याच महिन्यात या ठिकाणी झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. मात्र या घटनेनंतरही सिडकोला जाग आली नसून अजूनही या गटारांवरील झाकणे उघडीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. उघडे गटार, अस्वच्छ नाल्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी रोगराईचे प्रमाण वाढले असून नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गटारांची साफसफाई केली जात नसल्याने पाणी रोडवरून वाहू लागले आहे.नागरी आरोग्यकेंद्राचा गलथानपणादुपारच्या वेळी नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. डासांचा वाढता प्रादुर्भाव, अस्वच्छता, धुळीचे वाढते प्रमाण या साºयामुळे रोगराईचे प्रमाण वाढत असून उपचाराकरिता केवळ एकच नागरी आरोग्य केंद्र उपलब्ध आहे. दुपारच्या वेळी या ठिकाणी डॉक्टर हजर नसल्याने जर एखादा रुग्ण उपचाराकरिता आल्यास काय करावे, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला.नागरी आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागत असल्याचीही तक्रार नागरिकांनी नोंदविली. उलवे नोडमध्ये परवडणारी घरे उपलब्ध असल्याने चार वर्षांपासून अनेकांनी घरे खरेदी केली आहेत; परंतु सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना घरे बंद ठेवावी लागली आहेत. मानखुर्दवरून या ठिकाणी राहायला आलेल्या अनंत पाटील यांनी सिडकोच्या उदासीन काराभारावर नाराजी व्यक्त केली.सिडको प्रशासन नागरिकांना सुविधा देण्यात अपयशी ठरले असून येथील दैनंदिन जीवन त्रासदायक ठरत असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी असल्याने या जमिनींवर अजूनही हक्क गाजवित असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले.उलवेत पायाभूत सुविधांची वानवागेली काही वर्षे आम्ही या ठिकाणी राहण्यास आलो; मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत या ठिकाणी नागरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. या ठिकाणी अजूनही येण्या-जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. शहराचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाºया सिडकोने उलवे नोड विकसित करण्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी राहणारे सर्वच नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत.- अनंत पवार, रहिवासीपरिसरात बसथांबाच नाहीनागरिकांना भर उन्हात तसेच पावसात ताटकळत राहावे लागते. अनेकदा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येत नाही. बामणडोंगरी येथील रिक्षा थांब्याची दुरुस्ती न केल्याने या ठिकाणी रिक्षा उभ्या करता येत नाहीत. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून काही ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.- रवींद्र नाईक, रिक्षाचालकनागरिकांकडून स्वखर्चाने मैदानाची स्वच्छतासेक्टर १९ परिसरातील मैदान विकसित झाले नसून स्थानिक खेळाडूंचा हिरमोड झाला आहे. मैदानाची जागा कधीच स्वच्छ केली जात नसून स्थानिक नागरिक स्वखर्चाने या ठिकाणी मैदान स्वच्छ करून वापरतात. यासंदर्भात सिडकोकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातलेगेले नाही. दिवसेंदिवस या ठिकाणी समस्यांमध्ये वाढच होत असून नागरिकांना कित्येक समस्यांना सामोरे जावे लागतआहे.- आरती धुमाळ,स्थानिक रहिवासीभाजी मंडई नसल्याने अडचणभाजी मंडई नसल्याने गृहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शॉपिंग क ॉम्प्लेक्समध्येच दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळत असून फळे, भाजीपाल्याकरिता स्वतंत्र मंडई नसल्याने अनेक अडचणी येतात. उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते.- बीना शामंत, गृहिणीखेळण्यासाठी जागाच नाहीदिवसेंदिवस समस्यांमध्ये वाढ होत असून अर्धवट कामामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नादुरुस्त फुटपाथ, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नसल्याने रहिवासी संकुल परिसरातच खेळावे लागते. तसेच रस्त्यांची दुरवस्था झाली असून मुलांना सायकलचा वापर करता येत नाही.- अनन्या मंडल, गृहिणी>रस्त्यांची दुरवस्थाउलवे नोडमधील रस्त्याची स्थिती गंभीर आहे. मुख्य रस्त्याची स्थिती ठीक असली, तरी अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालविणे अशक्य होऊ लागले असून, वारंवार अपघात होऊ लागले आहेत. पथदिवेही बसविण्यात आलेले नाहीत.गटारांची स्थितीही अत्यंत गंभीर आहे. नोडमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनएमएमटीची बस वेळेत येत नसून बस थांबा नसल्याने भर उन्हात तसेच पावसात बसची वाट पाहण्यासाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.>उद्यानाला टाळासेक्टर २ परिसरातील उद्यान खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून काम पूर्ण झाल्यानंतरही उद्यान खुले न केल्याने संताप व्यक्त केला आहे. उलवे परिसरात खेळण्यसाठी मैदान, उद्यानांची कमतरता असून या ठिकाणी केवळ एकच उद्यान विकसित करण्यात आले. मात्र तेही बंदच असल्याचे दिसून आले.उद्यानातील खेळाचे साहित्य या ठिकाणी लावण्यात आले असून वापराविना हे साहित्य खराब होईल याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवेशद्वाराला कुलूप लावून ठेवल्याने चिमुरड्यांना मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी नेता येत नसल्याची नाराजी पालकांनी व्यक्त केली.